धाराशिव – येडशी येथील प्रसिद्ध रामलिंग देवस्थान येथे श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेत स्थानिक कर वसुली ठेकेदार भाविकांकडून वाहन पार्किंगच्या नावाखाली कर वसूल करतात. या कर वसुलीवरून अनेकदा वाद निर्माण होतात. अशाच एका वादात पार्किंगचे पैसे न देणाऱ्या दुचाकीस्वाराला ठेकेदाराने धक्काबुक्की करून त्याच्यासोबत असलेल्या महिलेची ओढणी ओढल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून ठेकेदाराच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे.
श्रावण महिन्यात येडशी येथील रामलिंग देवस्थान येथे भाविकांची मोठी गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेत स्थानिक ठेकेदार भाविकांकडून वाहन पार्किंगच्या नावाखाली कर वसूल करतात. मात्र, या कर वसुलीबाबत अनेकदा वाद निर्माण होतात. असाच वादाचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. कर न देणाऱ्या एका दुचाकीस्वाराला ठेकेदाराने धक्काबुक्की केली. इतकेच नव्हे तर त्याच्यासोबत असलेल्या महिलेची ओढणी ओढल्याची घटना घडली. या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ठेकेदाराच्या या दादागिरीचा भाविकांकडून निषेध केला जात आहे.
या घटनेनंतर भाविकांनी संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. देवस्थानात येणाऱ्या भाविकांकडून अशाप्रकारे कर वसूल करणे आणि वाद निर्माण झाल्यास त्यांच्याशी गैरवर्तन करणे हे निषेधार्ह आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी भाविक करत आहेत.
येडशी रामलिंग येथे ठेकेदाराची गुंडगिरी पाहा pic.twitter.com/VluYq4keGI
— Dharashiv Live (@dhepesm) August 24, 2024
धक्काबुकी नव्हे, बेदम मारहाण
या घटनेसंदर्भात बार्शीच्या प्रत्यक्षदर्शी सुमित खरांगळे यांनी व्हिडिओ जरी केला आहे. त्यांनी सांगितले की, एका दाम्पत्याला ठेकेदारांनी बेदम मारहाण केली. महिलेची ओढणी ओढली, तसेच आपण मध्यस्थी करायला गेलो तर चारचाकी वाहनातून आलेल्या टोळक्याने मारहाण केली. केवळ वीस रुपयांसाठी हा सर्व प्रकार घडला आहे. पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी.