मुरुम – येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळेत एका शिक्षकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. नुरअहमद पिरअहमद कानकुर्ती (५४) या शिक्षकाला रजिस्टरवर सही घेण्याच्या कारणावरून नसीर नजीर कुरेशी, जैनबी नसीर कुरेशी, रुबाबी अत्तार, इब्राहीम सय्यद कुरेशी, मशाक इबृराहीम कुरेशी, सय्यद इब्राहीम कुरेशी आणि इतर एका इसमाने लाथाबुक्क्यांनी, खुर्ची आणि काठीने मारहाण केली. या घटनेत कानकुर्ती हे जखमी झाले असून त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
या प्रकरणी कानकुर्ती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुरुम पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(1), 189(2), 191(2), 190, 352,351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाळींब गावात वृद्ध महिलेवर क्रूर हल्ला, गुन्हा दाखल
उमरगा – तालुक्यातील दाळींब गावात एका वृद्ध महिलेवर क्रूर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. 66 वर्षीय पार्वती मारुती लामजणे यांना 18 सप्टेंबर रोजी रात्री शेतात मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अनिल शंकर मुळे आणि समर्थ अनिल मुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्वती लामजणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना शेतात मारहाण केल्याबद्दल विचारणा केली. यावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. तसेच, आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. पार्वती लामजणे यांनी 22 सप्टेंबर रोजी मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अनिल शंकर मुळे आणि समर्थ अनिल मुळे यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(2), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
उमरग्यात आर्थिक वादातून मारहाण, गुन्हा दाखल
उमरगा – तालुक्यातील मातोळा येथे दि. २१ सप्टेंबर रोजी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर बाबु गायकवाड, सुरज परमेश्वर गायकवाड, दत्तु बाबु गायकवाड आणि प्रथमेश दत्तु गायकवाड या चौघांनी दिगंबर कोंडीबा भोसले यांच्यावर आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच, त्यांना सळईने मारहाण करून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर दिगंबर भोसले यांनी २२ सप्टेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिवमध्ये शेतीच्या वादातून मारहाण, गुन्हा दाखल
धाराशिव – तालुक्यातील आळणी येथे शेतीच्या वादातून एका 75 वर्षीय वृद्धाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र रावसाहेब निंबाळकर याने 19 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आळणी शिवारातील शेत गट क्रमांक 392 मध्ये फिर्यादी रावसाहेब शंकर निंबाळकर (वय 75) यांना शेतीच्या वादातून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर फिर्यादी रावसाहेब निंबाळकर यांनी 22 सप्टेंबर रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजेंद्र निंबाळकर विरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.