तेरखेडा… एक फटाक्यांसाठी प्रसिद्ध गाव. पण इथे फक्त फटाके नाहीत, इथे अनधिकृत कारखान्यांचा स्फोटक संसारही आहे!
- कायद्याचे तीनतेरा वाजवून फटाका उत्पादन!
- परवाना नसलेले विक्रेते आणि काळाबाजार!
- अधिकाऱ्यांचे मॅनेजमेंट आणि पैसे खाऊन डोळेझाक!
संपूर्ण धाराशिव, सोलापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातून येथे स्वस्त फटाक्यांसाठी गर्दी होते. पण ही स्वस्ताईच अखेर जीवावर बेततेय!
🔥 २९ जानेवारी: एका भ्रष्ट व्यवस्थेचा स्फोट!
🔹 बाबा फायर वर्क्स फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला.
🔹 ९ कामगार जखमी झाले, अनिल तोरडमल यांचा मृत्यू झाला.
🔹 हा स्फोट फक्त बारुदाचा नव्हता, तो अपयशी व्यवस्थेचा, भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आणि पैशाच्या हव्यासाचा होता!
🚨 धाराशिव LIVE: जिथे प्रशासन झोपले, तिथे आम्ही पेटून उठलो!
स्फोटानंतर काय झालं असतं?
✅ अधिकारी येऊन पंचनामा करतात.
✅ चार दिवस धूळफेक करतात.
✅ अहवाल फाईलमध्ये बंद करतात आणि प्रकरण संपतं.
पण यावेळी तसं झालं नाही!
धाराशिव LIVE ने हा विषय धडाडीने, निर्भीडपणे आणि सातत्याने मांडला!
✅ अनधिकृत कारखान्यांची यादी बाहेर काढली.
✅ फटाक्यांच्या काळ्या धंद्यावर प्रकाश टाकला.
✅ भ्रष्ट अधिकाऱ्यांना उघडे पाडले.
✅ जनतेच्या आवाजाला धार दिली.
याच निर्भीड पत्रकारितेमुळे चौकशी समिती स्थापन झाली, कारखान्यांच्या तपासणीचे आदेश निघाले!
💣 साखळी फुटली आणि कारखानादार पळाले!
धाराशिव LIVE ने मालिका सुरू केल्यानंतर अचानक चित्र बदललं.
- अनधिकृत कारखानदार गुप्त झाले.
- दुकानदारांनी बोर्ड काढले आणि गायब झाले.
- जे आजवर अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ करून चालले होते, त्यांना सगळं संपल्यासारखं वाटायला लागलं!
म्हणजेच त्यांची चोरी पकडली गेली, त्यांचा काळाबाजार उघडकीस आला आणि आता ते लपून बसले आहेत!
💰 ‘बातमी दाबा, पैसे घ्या!’ – भ्रष्टांची सुपारी!
धाराशिव LIVE ने हे प्रकरण पुढे नेऊ नये म्हणून एका पत्रकारामार्फत आम्हाला पैशांचे आमिष दाखवले गेले!
- मालिका थांबवा, आम्ही पैसे देतो!
- बातमी दाबा, तुम्हाला तुमचा वाटा मिळेल!
- लोकांचा जीव जातोय, पण आम्हाला काही फरक पडत नाही!
माफ करा, आम्ही विकले जाणारे नाही!
✅ बातमी दाबत नाही.
✅ मढ्याच्या टाळूवरील लोणी खात नाही.
✅ पत्रकारिता विकत घेता येत नाही!
धाराशिव LIVE ही फक्त एक न्यूज चॅनेल नाही, ही लोकशाहीचा चौथा स्तंभ सांभाळणारी एक चळवळ आहे.
🛑 आता काय व्हायला हवं?
📢 संपूर्ण फटाका कारखान्यांची SIT चौकशी झाली पाहिजे.
📢 फायर ऑडिटशिवाय परवाने कसे दिले गेले याचा तपास झाला पाहिजे.
📢 अनधिकृत कारखान्यांचे मालक आणि त्यांना परवानगी देणारे अधिकारी यांना गजाआड केले पाहिजे.
📢 जखमींना योग्य ती भरपाई मिळाली पाहिजे, मृतांच्या कुटुंबीयांना त्वरित मदत झाली पाहिजे.
🚨 धाराशिव LIVE थांबणार नाही!
जर आम्ही इथे थांबलो, तर उद्या पुन्हा कुठेतरी नवीन अनिल तोरडमलचा बळी जाईल.
✅ आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू.
✅ आम्ही जनतेचा आवाज बनत राहू.
✅ आम्ही सचोटीची पत्रकारिता करत राहू.
हा लढा फक्त तेरखेड्यापुरता मर्यादित नाही, हा लढा जनतेच्या हक्कांसाठी आहे!
धाराशिव LIVE असंच निर्भीड राहील, कारण आम्ही पैशांसाठी विकले जाणारे नाही, आम्ही जनतेसाठी लढणारे आहोत!