धाराशिव : धाराशिव नगरपरिषदेत उभा असलेला स्वराज कंपनीचा लाल रंगाचा हेड क्र एमएच ११ डीएन ५७१४ आणि दोन चाकी डंपींग ट्रॉली असा एकूण १,६०,००० रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना १९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री साडेआठ वाजल्यापासून २० सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे पाच वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. याप्रकरणी सागर शेषेराव प्रधान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंडा : परंडा येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या इरिगेशन सिस्टीमच्या दुकानात २० सप्टेंबर २०२४ रोजी रात्री साडेसात ते २१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी साडेनऊ या वेळेत चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी दुकानामागील पत्रे उचकटून आत प्रवेश केला आणि ३,२७,०४० रुपये किमतीचा माल चोरून नेला. यामध्ये रेन पाईप, पेप्सी पाईप, फिटिंग साहित्य, बॉलहॉल आणि रोख रक्कम ५००० रुपये यांचा समावेश आहे. याप्रकरणी जयवंत सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.न्या.सं. 331(4),305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेत आहेत.