धाराशिव – वाघोली येथील रहिवासी प्रदीप शिंदे यांच्या घरात शिरून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमोल गाडेकर याच्या विरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप शिंदे हे दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्या कुटुंबासह शेतात गेले असताना, अमोल गाडेकर हा त्यांच्या स्वयंपाक घरावरील पत्रे उचकटून घरात शिरला. चोरी करण्याच्या उद्देशाने तो बेडरूममध्ये लपून बसला होता. मात्र, शिंदे कुटुंब शेतातून परत आल्यावर त्यांना गाडेकर घरात आढळून आला.
याप्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३३१(३), ३०५(ए), ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.