धाराशिव जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांची मालिका सुरूच असून, कळंब आणि भुम पोलीस ठाण्यात विविध प्रकारच्या चोरी आणि फसवणुकीच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
कळंब येथे वृद्धाला लुटले
कळंब येथे ७७ वर्षीय रमाकांत गोरे यांना दोन अनोळखी इसमांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दंगल चालू आहे’ असे सांगून त्यांची ८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत ५०,४०० रुपये) बळजबरीने काढून घेतली. या घटनेप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नामे- रमाकांत किसनराव गोरे, वय 77 वर्षे, रा. कल्पना नगर कळंब ता. कळंब जि.धाराशिव बी एस एन एल ऑफीस कळंब चे गेट समोरील डावे बाजूस असलेले बंद पत्र्याचे शेड समोर असताना अनोळखी दोन इसमांनी रमाकांत गोरे यांना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दंगल चानलू आहे.असे सांगून आपल्या कडील सोन्याची अगंटी काढून आमच्या कडे द्या त्यावर नमुद आरोपींनी फिर्यादीस ढकलून देवून त्यांची अंदाजे 50,400₹ किंमतीची 8 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेवून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रमाकांत गोरे यांनी दि.03.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. 309(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम येथे दुकानातून चोरी
भुम येथे नंदकुमार ज्वेलर्स या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३,४२० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २,९२,५४० रुपये किमतीचा माल लंपास केला. या प्रकरणी भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नामे-नंदकुमार दिगंबर वेदपाठक, वय 54 वर्षे, रा. राममंदीर शेजारी कसबा भुम यांचे गांधी चौक भुम येथील नंदकुमार ज्वेलर्स नावाचे दुकानाचे कुलूप अज्ञात व्यक्ती दि. 02.09.2024 ते 20.00 ते दि. 03.09.2024 रोजी 05.00 वा. सु. जोडून आत प्रवेश करुन 3,420 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व बापुराव गौरीशंकर उंबरे यांचे राहते घराचे कडी कोंडा तोडून घरातील 9 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 2,92,540₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नंदकुमार वेदपाठक यांनी दि.03.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. 331(4), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब येथे शेतातून चोरी
कळंब येथे महादेव मुंडे यांच्या शेतातून ७२,००० रुपये किमतीचे स्वीस ऑल आणि एअर ऑल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणीही कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंब पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-महादेव श्रीराम मुंडे, वय 25 वर्षे, व्यवसाय सुपरवायझर महाराष्टर जिवन प्राधिकरण विभाग धाराशिव रा.अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई जि. बीड यांचे दि. 01.09.2024 रोजी 14.00 ते दि. 03.09.2024 रोजी 10.00 वा. सु. रांजेद्र दगडुअप्पा मुंडे यांचे शेतातील वार्षी भाडेतत्तावार घेतलेल्या गोडावून समोर डिकसळ येथुन 72,000₹ किंमतीचे 6 स्वीस ऑल, दोन एअर ऑल हे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महादेव मुंडे यांनी दि.03.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.