• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजाभवानी देवीचे सोने वितळवण्यावरून प्रशासनाला न्यायालयाच्या अवमाननेची नोटीस

उच्च न्यायालयाची परवानगी नसतानाही नव्याने ठराव करून शासनाकडे मंजुरी मागितल्याचा हिंदु जनजागृती समितीचा आरोप

admin by admin
September 8, 2026
in मुख्य बातमी
Reading Time: 1 min read
बेंबळी : मुलाने घेतले कंत्राट, सरपंच आईचे गेले सदस्यत्व; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा मोठा निकाल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव/तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिरात भक्तांनी अर्पण केलेले तब्बल २४७ किलो सोने आणि ३२९८ किलो चांदी वितळवण्याचा नव्याने ठराव करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर वाद निर्माण झाला आहे. मंदिर प्रशासनाने राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे यासाठी मंजुरी मागितल्याचा दावा हिंदु जनजागृती समितीने केला आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने यापूर्वीच सोने वितळवण्यासंदर्भातील प्रशासनाची याचिका फेटाळली असताना पुन्हा परवानगी मागणे हे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचा आरोप समितीने केला आहे.

या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता उमेश भडगांवकर यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव तसेच विधी व न्याय विभागाच्या सचिवांना ‘न्यायालयाच्या अवमाननेची नोटीस’ बजावल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने संबंधित ठराव मागे न घेतल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

२००९ नंतरचे सोने वितळवण्यासही परवानगी नाकारल्याचा दावा

समितीच्या म्हणण्यानुसार, मंदिर प्रशासनाचा दावा आहे की केवळ २००९ नंतरचे सोने वितळवण्यात येणार आहे. मात्र, २३ जानेवारी २०२५ रोजी उच्च न्यायालयाने २००९ नंतरचे सोने वितळवण्यासंदर्भातील प्रशासनाची याचिका फेटाळली होती, असा दावा समितीने केला आहे. त्यामुळे त्यानंतर नव्याने ठराव करून शासनाकडे मंजुरी मागणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.

दागिने खोटे निघाल्याच्या मुद्द्यावरही समितीचा आक्षेप

सोने वितळवण्यास विरोध करताना समितीने मंदिरातील मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी उच्च न्यायालयाने सोने वितळवण्यावर स्थगिती देताना एका भक्ताने अर्पण केलेला सोन्याचा मुकुट खोटा असल्याचे नमूद केले होते, असा दावा समितीने केला आहे.

मंदिरातील प्राचीन ७१ नाणी, सोन्याचा मुकुट आणि मंगळसूत्र गायब असल्याचा आरोपही समितीने केला आहे. अशा परिस्थितीत उर्वरित सोने वितळवल्यास दागिन्यांच्या अस्सलतेशी संबंधित पुरावे नष्ट होण्याची शक्यता असून, त्यामुळे कथित गैरव्यवहाराची चौकशी प्रभावित होऊ शकते, असा दावा समितीने केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीबाबतही समितीचा दावा

प्रशासनाकडून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाला स्थगिती दिल्याचा दावा केला जात असल्याचे समितीने म्हटले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती ८.५० कोटी रुपयांच्या कथित अपहार प्रकरणातील १६ दोषींवर गुन्हे दाखल करण्यापुरती मर्यादित असल्याचा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे. या स्थगितीचा सोने वितळवण्याच्या परवानगीशी संबंध नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.

जिल्हा प्रशासनाने सोने वितळवण्याचा ठराव तातडीने मागे न घेतल्यास धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध त्यांच्या वैयक्तिक क्षमतेत ‘फौजदारी अवमान याचिका’ दाखल केली जाईल, असा इशारा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय संघटक तथा मंदिर महासंघाचे सुनील घनवट यांनी दिला आहे.

Previous Post

भिकारसारोळा : पाण्याच्या टाकीजवळ मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला ढोकी पोलिसांकडून अटक; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

बेंबळी : मुलाने घेतले कंत्राट, सरपंच आईचे गेले सदस्यत्व; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा मोठा निकाल

तुळजाभवानी देवीचे सोने वितळवण्यावरून प्रशासनाला न्यायालयाच्या अवमाननेची नोटीस

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भिकारसारोळा : पाण्याच्या टाकीजवळ मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला ढोकी पोलिसांकडून अटक; गुन्हा दाखल

September 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

मेडसिंगा : घरातील हिस्सा मागितल्याच्या कारणावरून पती-पत्नीवर बांबू, फायटर अन् विटांनी जीवघेणा हल्ला

September 7, 2026
धाराशिव : पोलिसांच्या अंगावर टेम्पो घालून पळणाऱ्या महामार्गावरील कुख्यात लुटारू टोळीला एलसीबीने ठोकल्या बेड्या

धाराशिव : पोलिसांच्या अंगावर टेम्पो घालून पळणाऱ्या महामार्गावरील कुख्यात लुटारू टोळीला एलसीबीने ठोकल्या बेड्या

September 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी देवीचे सोने वितळवण्यावरून प्रशासनाला न्यायालयाच्या अवमाननेची नोटीस
  • भिकारसारोळा : पाण्याच्या टाकीजवळ मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला ढोकी पोलिसांकडून अटक; गुन्हा दाखल
  • मेडसिंगा : घरातील हिस्सा मागितल्याच्या कारणावरून पती-पत्नीवर बांबू, फायटर अन् विटांनी जीवघेणा हल्ला
  • धाराशिव : पोलिसांच्या अंगावर टेम्पो घालून पळणाऱ्या महामार्गावरील कुख्यात लुटारू टोळीला एलसीबीने ठोकल्या बेड्या
  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!