• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?

 मटका किंगसह धनदांडग्यांना थेट गाभाऱ्यात प्रवेश दिल्याचा आरोप; भोपे पुजारी मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

admin by admin
October 14, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर / धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सामान्य भाविक तासनतास रांगेत उभे असताना, दुसरीकडे राजकीय वशिलेबाजी आणि बनावट पासेसच्या माध्यमातून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना थेट गाभाऱ्यात व्हीआयपी प्रवेश दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर येथील एका नामांकित मटका बुक्कीमालकासह धनदांडग्यांना नियमबाह्य प्रवेश दिल्याप्रकरणी आणि बनावट पासेस तयार करून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ‘श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळा’ने जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.

मटका किंगला थेट गाभाऱ्यातून व्हीआयपी दर्शन?

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला, ज्याच्यावर प्रतिबंधक कारवाया व तडीपारीचे गुन्हे नोंद आहेत असा अरुण प्रभाकर रोडगे उर्फ दादा रोडगे याने मंदिराचे सर्व नियम धाब्यावर बसवून गाभाऱ्यात प्रवेश मिळवला. हा प्रवेश महंत वाकोजीबुवा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे खाजगी सचिव सुधीर जमदाडे आणि तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद (पिटू ) गंगणे यांच्या मदतीने व राजकीय पदाचा गैरवापर करून मिळवून देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सर्वसामान्य भाविक उन्हातान्हात दर्शन रांगेत तिष्ठत असताना अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना व्हीआयपी वागणूक दिल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बनावट पासेसद्वारे परराज्यातील श्रीमंतांकडून वसुली?

भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे अंबादासराव कदम-परमेश्वर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात आणखी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी होणारे ‘चरणतीर्थ’ आणि रात्रीची ‘प्रक्षाळ पूजा’ या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विधींचा गैरफायदा उठवण्यात आला. तुकोजीबुवा गंगणे महाराज आणि विशाल रोचकरी यांनी बनावट पास तयार करून मंदिर अधिकारी व सुरक्षा रक्षकांशी संगनमत साधल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. या टोळीने परराज्यातील धनिक भाविकांकडून मोठी रक्कम उकळून त्यांना देवीच्या गाभाऱ्यात बेकायदेशीरपणे सोडल्याचे आणि १४ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या आरतीनंतरही १५ ते २० जणांना थेट गाभाऱ्यात बेकायदेशीर दर्शन घडवून आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

फसवणूक आणि सुरक्षेशी तडजोड; बीएनएस अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी

हे कृत्य केवळ मंदिर नियमावलीचा भंग नसून शासनाची व संस्थानची कोट्यवधी रुपयांची फसवणूक आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८ (फसवणूक), कलम ३३६/३४०, कलम ६१ तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील तरतुदींचे हे थेट उल्लंघन असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. देवीचे मौल्यवान ऐतिहासिक दागिने व अलंकारांची सुरक्षा धोक्यात आणल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे.

तक्रारीतील प्रमुख मागण्या:

१. तुकोजीबुवा गंगणे महाराज, विशाल रोचकरी , सुधीर जमदाडे, विनोद पिटू गंगणे तसेच संगनमत करणारे मंदिर अधिकारी व सुरक्षारक्षकांवर तत्काळ भारतीय न्याय संहितेनुसार एफ.आय.आर. (FIR) दाखल करावा.

२. सोलापूरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मटका बुक्कीमालकाला कोणाच्या आशीर्वादाने गाभाऱ्यात सोडले, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.

३. १४ ऑक्टोबर रोजी रात्री १०:०० ते ११:०० वाजेदरम्यानचे तसेच दररोजच्या चरणतीर्थ व प्रक्षाळ पूजेच्या वेळेचे गर्भगृह व परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज जप्त करून फॉरेन्सिक तपास करण्यात यावा.

४. वितरित झालेले व वापरलेले सर्व पास बारकाईने तपासून बनावट पास छापणारे रॅकेट आणि त्यातील आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सक्षम गुन्हे अन्वेषण शाखेकडून केली जावी.

५. गैरप्रकारात सहभागी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करून बडतर्फ करावे आणि सर्वसामान्यांसाठी समान नियमांची कठोर अंमलबजावणी करावी.

या संवेदनशील प्रकरणावर आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग काय कठोर कारवाई करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?

तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?

October 14, 2026
ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार

ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार

October 14, 2026
 ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!

 ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!

October 13, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

परंडा तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना; जनावरे, टायर, केबलसह लोखंडी साहित्य लंपास

October 13, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?
  • ब्रेकिंग न्यूज : तुळजापूर हादरले! नगरपरिषद वाहनतळासमोर मध्यरात्री दोन गटांत तुंबळ राडा अन् गोळीबार
  •  ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!
  • परंडा तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना; जनावरे, टायर, केबलसह लोखंडी साहित्य लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!