तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच रंगतदार ठरत असून प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार आण्णासाहेब दराडे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात प्रमुख पक्षांमध्ये भाजप, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षात तिरंगी लढत होत आहे. भाजपचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील, काँग्रेसचे ऍड. धीरज पाटील, आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे आण्णासाहेब दराडे हे या लढतीत प्रमुख उमेदवार आहेत.
आण्णासाहेब दराडे यांनी प्रचारासाठी अनोखी रणनीती स्वीकारली आहे. त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात भेटी देऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. दराडे यांच्या प्रचाराची विशेषता म्हणजे ते कोणत्याही प्रतिस्पर्ध्या पक्षावर टीका-टिप्पणी न करता संपूर्ण सकारात्मक प्रचार करत आहेत. या प्रचारामध्ये त्यांनी विकासाची मुद्दे, स्थानिक समस्या, आणि त्यांचे संभाव्य उपाय या विषयांवर मतदारांशी संवाद साधला आहे.
दराडे यांचा मृदू स्वभाव, श्रोत्यांच्या समस्या ऐकण्याची तयारी, आणि त्यांना दिलासा देण्याची वृत्ती मतदारांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. त्यांनी प्रचारादरम्यान विविध गावांमध्ये लोकांच्या समस्या समजून घेतल्या असून त्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो याबाबत मतदारांना दिलासा दिला आहे. स्थानिक पातळीवरून मतदारांचा त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा याचा प्रत्यय प्रचारादरम्यान दिसत आहे.
दराडे यांच्या या सकारात्मक प्रचारामुळे, तुळजापूर मतदारसंघातील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास वाढत आहे. त्यांच्या थेट गावभेटीमुळे गावागावात त्यांची छबी ‘आपल्या माणसाची’ निर्माण होत आहे.
भाजपचे राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे ऍड. धीरज पाटील हे देखील जोरदार प्रचार करत असले, तरी दराडे यांच्या सकारात्मक प्रचारामुळे मतदारांचे त्यांच्याकडे झुकलेले कल दिसून येत आहे. त्यामुळे तुळजापूर मतदारसंघात दराडे यांची वाढती लोकप्रियता निवडणुकीत त्यांना यश मिळवून देईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.