तुळजापूर :आरोपी नामे-1)सचिन विलास पारसे, रा. दत्तनगर, तेरणा कॉलेज जवळ धाराशिव ता. जि. धाराशिव अनोळखी एक यांनी दि.22.03.2024 रोजी 16.00 वा. सु. नळदुर्ग रोड वरील एचडीएफसी बॅके समोरुन तुळजापूर येथुन नमुद आरोपीने महिंद्रा बोलेरो क्र एमएच 04 जेके 4407 मध्ये हवा भरुन येतो म्हणून गाडी घेवून जावून गाडी मधील लोखंडी पेटी मध्ये ठेवलेली रोख रक्कम 85,00,000₹ चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वैभव शंकर शेरकर, वय 26 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी (हिताची कॅश मॅनेजमेंट ॲण्ड सर्व्हिसेस प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर) रा. घर नं 84 साळुंके नगर बेंबळी रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.23.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 406, 409, 420, 381, 120(ब), 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जिल्ह्यात चोरीचे सत्र
ढोकी : फिर्यादी नामे- बजरंग रामभाउ पोतदार, वय 66 वर्षे, रा. पळसप ता.जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 14.03.2024 रोजी 10.00 ते दि. 17.03.2024 रोजी 20.30 वा. सु. तोडून आत प्रवेश घरातील कपाटातील 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम 30,000₹ असा एकुण 45,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बजरंग पोतदार यांनी दि.23.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे- सुनिल तुकाराम पाटील, वय 65 वर्षे, रा. मांडवा ता. वाशी जि. धाराशिव हे घराचे छतावर झोपले असता त्यांचे राहाते घराचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 21.03.2024 रोजी 22.30 ते दि. 22.03.2024 रोजी 04.30 वा. सु. तोडून आत प्रवेश घरातील लोखंडी पेटीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 1,71,500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुनिल पाटील यांनी दि.23.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-सुधाकर रेवनसिध्द जाधव, वय 32 वर्षे, रा. केशवगाव ता. तुळजापूर ह.मु. भवानी चौक धाराशिव ता.जि. धाराशिव यांची अंदाजे 15,000₹ किंमतीची मोटरसायकल क्र एमएच 25 एई 0398 ही दि. 21.03.2024 रोजी 05.30 वा. सु. शांतीदीप बालरुग्णालय भवानी चौक धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुधाकर जाधव यांनी दि.23.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी: आरोपी नामे-1) सतिश भिमराव जगताप, 2) नाना भिमराव जगताप, 3) फुलचंद केरबा रंदील सर्व रा. इनगोंदा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 22.03.2024 रोजी 23.09 ते 23.45 वा. सु. नळी नदीच्या पात्रातुन अंदाजे 03 ब्रास गौन खनिज वाळु अंदाजे 15,000₹ किंमतीची स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये अवैधरित्या विनापास परवाना लबाडीच्या इराद्याने स्वत:च्या फायद्यासाठी वाळु चोरुन घेवून जात असताना आंबी पोलीसांना मिळून आले. यावरुन फिर्यादी नामे- रामकिसन दगडु कुंभार, वय 35 वर्षे पोलीस नाईक 1619 नेमणुक पोलीस ठाणे अंबी यांनी दि.23.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 379, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.