तुळजापूर :आरोपी नामे- 1)गणेश रोचकरी,2) लखन भोसले,3) विश्वजीत अमृतराव, 4) सुशांत सपाटे, सर्व रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव व सोबत दोन इसम( नाव पत्ता माहित नाही) यांनी दि.16.12.2023 रोजी 21.00 वा .सु. हाडको येथील हंगरगेकर शाळेच्या शेजारी मैदानात तुळजापूर येथे फिर्यादी नामे- गोरख भागवत पारधे, वय 31 वर्षे, रा. शुक्रवार पेठ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु आमच्या समोर पांढरे कपडे घालून फिरतो का असे म्हणून दहशत निर्माण करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, बियरची बाटलीने मारहण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचे समोर पिस्तुलच्या वरचा भाग खाली वर करुन कॉक करुन फिर्यादीचे कानसिलावर लावून जातीवाचक शिवीगाळ करुन फिर्यादीचे तोंडावर लघुशंका करुन सुपारी खावून तोंडावर थुंकली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- गोरख पारधे यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 307, 324, 143, 147, 148, 149, 504, 506, भा.दं.वि.सं.3(1) (ए), 3(1) (आर), 3 (1) (एस), 3(2)(व्हि), 3(2) (व्हि) (ए) अ.जा.ज.अ.प्र. कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर :आरोपी नामे-1) विकास बापजी माडजे (पती), 2) मुद्रीका माडजे, (आज सासु) दोघे रा. तीर्थ बु. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.16.12.2023 रोजी 07.30 वा. सु. तीर्थ बु. ता. तुळजापूर जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे- शितल विकास माडजे, वय 23 वर्षे, रा. तीर्थ बु. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींने कौटुंबिक वादाचे कारणावरुन जिवे मारण्याचे उद्देशाने अंगावर पेट्रोल टाकुन काडीपेटीने फिर्यादीचे अंगावरील कपड्यास आग लावून जाळून गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- शितल माडजे यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 498 (अ), 307, 323, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर :आरोपी नामे-सलीम हब्बीब पटेल, वय 60 वर्षे, रा. कुंभारी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 14.12.2023 रोजी 15.00 वा. सु. धणेगाव शिवार शेत गट नं 123 मध्ये फिर्यादी नामे-शिकुर हब्बीब पटेल, वय 71 वर्षे, रा. कुंभारी ता. तुळजापूर ह.मु. कोंडवा भाग्योदय नगर गल्ली नं 06 फ्लॅट नं 005 यांना नमुद आरोपीने शेताचे वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- शिकुर पटेंल यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी :आरोपी नामे-शाहुराज दिगंबर तिर्थकार(गुरव) रा. रुईभर ता. जि. धाराशिव यांनी दि. 18.12.2023 रोजी 11.30 वा. सु. रुईभर गावातील वेशीमध्ये वडाचे झाडाखाली फिर्यादी नामे- सागर उर्फ यशवंत शाहुराज तिर्थकार( गुरव), वय 32 वर्षे, रा. रुईभर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने कौटुंबिक वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राउीचे तुब्यांने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- सागर तिर्थकर (गुरव) यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी :आरोपी नामे-दादा अशोक रणखांब रा. टाकळी बेंबळी ता. जि. धाराशिव सोबत दोन अनोळखी इसम यांनी दि. 20.12.2023 रोजी 17.30 वा. सु. टाकळी शिवार शेत गट नं 24 येथे फिर्यादी नामे-शिवाजी दासा रणखांब, वय 65 वर्षे, रा. टाकळी बेंबळी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेत मालकीच्या हक्काचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- शिवाजी रणखांब यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.