• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘तीर्थक्षेत्रा’ला ‘ड्रग्जक्षेत्र’ बनवण्याचा हा ‘राजाश्रय’ कोणाचा?

admin by admin
November 12, 2025
in सडेतोड
Reading Time: 1 min read
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: आरोपींच्या भाजप प्रवेशावरून रान पेटले; सुप्रिया सुळेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, आमदार पाटील वादाच्या भोवऱ्यात
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

आई तुळजाभवानीच्या नावाने ज्या भूमीला पावित्र्य लाभले, त्या तुळजापुरात आज ‘ड्रग्ज’चा सुळसुळाट व्हावा, हे केवळ दुर्दैवी नाही, तर चीड आणणारे आहे. पण त्याहूनही संतापजनक बाब म्हणजे, जे हात तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलत आहेत, त्याच हातांना राजकीय ‘शुद्धीकरणा’चा स्पर्श दिला जात आहे. भारतीय जनता पक्षाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना दिलेला ‘शानदार’ प्रवेश, हा सत्तेच्या हव्यासापोटी गाठलेला नीतिमत्तेच्या ऱ्हासाचा कळस आहे.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हे काही साधेसुधे प्रकरण नाही. यात राजकीय नेतेच विक्रते आणि त्यांचे कार्यकर्तेच सेवन करणारे असल्याचा गंभीर आरोप आहे. दोन माजी नगराध्यक्ष आणि एका माजी नगराध्यक्षाच्या पतीवर (विनोद गंगणे) थेट आरोप आहेत. हाच गंगणे, जो स्थानिक आमदार राणा पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो, त्याला पोलिसांनी ‘टीप देणारा’ ठरवून जामिनावर मोकळे सोडल्याचा प्रकार ताजा आहे.

याच गंगणेने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार सोहळा घडवून आणत स्वतःचे ‘उदात्तीकरण’ करण्याचा प्रयत्न केला. तो वाद शमतो न शमतो तोच, आता त्याच ड्रग्ज प्रकरणातील आणखी दोन आरोपी, माजी नगराध्यक्ष संतोष कदम आणि बापू कणे, यांना थेट आमदार राणा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश दिला जातो. हा प्रकार म्हणजे ‘चोराच्या हातूनच तिजोरीच्या चाव्या’ देण्यासारखा आहे.

भारतीय जनता पक्ष स्वतःला ‘शिस्तप्रिय’ आणि ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवतो. पूर्वी याच पक्षात प्रवेश देताना गुन्हेगारी पार्श्वभूमीची कठोर छाननी होत असे. पण तुळजापूरच्या या घटनेने भाजपच्या त्या सर्व जुन्या निष्ठांना तिलांजली दिल्याचे दिसते. आता पक्षात प्रवेशासाठी ‘चारित्र्य’ नाही, तर ‘निवडून येण्याची क्षमता’ हाच एकमेव निकष उरला आहे का? आणि ही क्षमता जर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींमध्ये दिसत असेल, तर हा या पक्षाचा वैचारिक गोंधळ नसून, सत्तेसाठी केलेला निर्लज्जपणाचा सोहळा आहे.

आमदार राणा पाटलांना नेमके काय साध्य करायचे आहे? ज्यांच्यावर ड्रग्ज विकल्याचा, एका तीर्थक्षेत्राला बट्टा लावल्याचा गंभीर आरोप आहे, अशा लोकांना पक्षात घेऊन ते जनतेला काय संदेश देत आहेत? हा ‘ड्रग्ज माफियांचे उदात्तीकरण’ करण्याचाच प्रकार नाही का? नगरपालिका जिंकण्यासाठी इतके खालच्या थराला जाण्याची गरज का पडावी?

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या ‘राजाश्रया’वर बोट ठेवले आहे. त्यांची चिंता रास्त आहे. जेव्हा व्यवस्थेचा भाग असलेले लोकच आरोपींना संरक्षण देऊ लागतात, तेव्हा सामान्यांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची?

हा फक्त एका पक्षाच्या प्रवेशाचा विषय नाही. हा विषय तुळजापूरच्या अस्मितेचा आहे. हा विषय त्या हजारो तरुण मुला-मुलींच्या भविष्याचा आहे, ज्यांना ड्रग्जच्या विळख्यापासून वाचवण्याची जबाबदारी याच नेत्यांवर होती. मात्र, इथे ‘कुंपणच शेत खात’ असेल, तर दाद मागायची कुठे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या पत्राची काय दखल घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ते आपल्याच पक्षाच्या आमदाराच्या या कृतीवर पांघरूण घालणार, की ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्रा’साठी खरोखरच कठोर पाऊल उचलणार? तुळजापूरच्या जनतेचे डोळे आता मुंबईकडे लागले आहेत. कारण प्रश्न फक्त निवडणुकीचा नाही, तर एका पवित्र शहराच्या अस्तित्वाचा आहे!

– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह

Previous Post

धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त होणार

Next Post

४३ लाख रुपये मागितल्याचा राग; धाराशिवमधील व्यक्तीला ‘डोक्यात गोळी घालतो’ म्हणून पळवले

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

४३ लाख रुपये मागितल्याचा राग; धाराशिवमधील व्यक्तीला 'डोक्यात गोळी घालतो' म्हणून पळवले

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026
दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

September 5, 2026
तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
  • दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम
  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!