तुळजापूरमध्ये गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात भाजप पदाधिकारी आणि तुळजापूर पंचायत समितीच्या माजी सभापतीचा मुलगा विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे (रा. सराटी) याला तामलवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
पिंटू मुळे हा ड्रग्ज रॅकेटचा प्रमुख सूत्रधार असून, त्याची आई सभापती असताना तोच ही सूत्रे हलवत होता. तुळजापुरातील अनेक नेत्यांना ड्रग्ज पुरवण्याचे काम त्याने केले आहे.
गुन्हेगारीचा मास्टरमाईंड!
- पिंटू मुळे हा केवळ ड्रग्ज तस्करीतच नाही, तर इतर ‘दोन नंबर’च्या धंद्यातही मास्टर आहे.
- त्याने तुळजापुरातील राजकीय नेत्यांपर्यंतही ड्रग्जचा पुरवठा केला असल्याची माहिती समोर येत आहे.
15 दिवसांत 6 आरोपी गजाआड, एकूण 12 जण संशयित!
या प्रकरणात एकूण 12 जण संशयित असून, आतापर्यंत 15 दिवसांत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपींची यादी:
- संगीता गोळे (मुंबई)
- अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे (रा. तुळजापूर)
- युवराज देविदास दळवी (रा. तुळजापूर)
- संदीप संजय राठोड (रा. नळदुर्ग)
- संतोष खोत (मुंबई)
- विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे (रा. सराटी) – भाजप पदाधिकारी
मुख्य आरोपी अद्याप फरार!
- संगीता गोळे हिचा पती वैभव गोळे आणि तुळजापूरचा स्वराज्य उर्फ पिनू तेलंग अद्याप फरार आहेत.
- पोलिसांनी यांच्याविरोधात शोधमोहीम सुरू केली असून, लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना थेट इशारा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज तस्करीविरोधात कठोर भूमिका घेत पोलीस यंत्रणेला स्पष्ट आदेश दिले आहेत:
“ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचा सहभाग आढळल्यास त्याला थेट बडतर्फ करण्यात येईल!”
या आदेशानंतर तुळजापूर पोलीस पूर्ण ऍक्शन मोडवर आले आहेत.
‘बडे मासे’ कधी गळाला लागणार?
भाजप पदाधिकाऱ्याचा समावेश झाल्याने या प्रकरणाचे राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटले आहेत.
- तुळजापुरातील राजकीय ‘गॉडफादर’ कोण?
- या टोळीला पाठीशी घालणारे मोठे राजकीय नेते कोण?
- ड्रग्ज व्यवसायाला आर्थिक आधार देणाऱ्या ‘बड्या मास्यां’वर कारवाई कधी होणार?
तुळजापूर आणि परंड्यात या प्रश्नांची चर्चा रंगली आहे. आता पोलीस पुढे कोणावर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!