तुळजापूर | देवीच्या साडेतीन पिठापैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे पोलिसांच्या आशीर्वादाने गेल्या तीन वर्षांपासून ड्रग्जचा किळसवाणा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तामलवाडी पोलिसांनी एक महिन्यापूर्वी तीन आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणाचे धक्कादायक बिंग फुटले आहे.
२५ आरोपीं, १२ फरार, राजकीय वर्तुळात खळबळ
या प्रकरणात एकूण २५ आरोपींचा समावेश असून सध्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर १० आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत आणि १२ आरोपी फरार आहेत. फरार आरोपींच्या यादीत माजी नगराध्यक्ष, माजी सभापती आणि राजकीय व्यक्तींचाही समावेश असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सध्या अटक असलेले आरोपी:
- सुलतान लतीफ शेख (वय ३४) – पुणे
- जीवन नागनाथ साळुंखे (वय २९) – सोलापूर
- राहुल कदम – परमेश्वर (तुळजापूर) – पोलिसाचा मुलगा
न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी:
- विश्वनाथ तर्फ पिंटू आप्पाराव मुळे (वय ४०) – सराटी, ता. तुळजापूर
- सयाजी शाहूराज चव्हाण (वय २५) – तुळजापूर
- ऋतुराज सोमनाथ गाहे (वय २४) – तुळजापूर
- सुमित सुरेशराव शिंदे (वय ३५) – तुळजापूर
- संकेत अनिल शिंदे (वय २३) – तुळजापूर
- संगिता वैभव गोळे (वय ३२) – मुंबई
- संतोष अशोक खोत (वय ४९) – मुंबई
- अमित उर्फ चिम्या अशोकराव अरगडे (वय ३३) – तुळजापूर
- युवराज देवीदास दळवी (वय ३८) – तुळजापूर
- संदीप संजय राठोड (वय २२) – नळदुर्ग, ता. तुळजापूर
फरार आरोपींमध्ये मोठी नावे:
- विनोद उर्फ पिटू गंगणे – माजी नगराध्यक्ष पती
- चंद्रकांत उर्फ बापू कणे – माजी नगराध्यक्ष, तुळजापूर
- शरद रामकृष्ण जमदाडे – माजी सभापती
- इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर – नळदुर्ग
- स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग – तुळजापूर (माजी नगराध्यक्षांचा हस्तक)
- वैभव अरविंद गोळे – मुंबई (आरोपी संगिता गोळे हिचा पती)
- प्रसाद उर्फ गोटन कदम – परमेश्वर (तुळजापूर)
- : उदय शेटे
- गजानन प्रदीप हंगरगेकर
- आबासाहेब गणराज पवार
- अलोक शिंदे
- अभिजित गव्हाड
या प्रकरणात फरार आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा तपास तामलवाडी पोलिसांकडून काढून एसआयटीकडे देण्याचेही मागणी जोर धरत आहे.
आरोपींना अभय देणाऱ्या तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्यावर तसेच इतर संबंधित पोलिसांवर देखील गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची मागणी होत आहे.
जनतेची मागणी – आरोपीना मोक्क्का लागू करा!
या संपूर्ण प्रकारामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. ड्रग्ज माफियांना अभय देणाऱ्या पोलिसांविरोधात कठोर कारवाईसह सर्व आरोपींवर मोक्क्का लागू करण्याची मागणी केली जात आहे.