तुळजापूर : येथील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन दीड महिन्याचा काळ लोटला असला तरी, तपासाला अपेक्षित गती मिळत नसल्याचे चित्र आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी केवळ ४ जणांना अटक करण्यात आली आहे, तर १० जण सध्या तुरुंगात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल २१ आरोपी अजूनही फरार असून, त्यात अनेक बड्या नावांचा समावेश आहे.
प्रकरणाला दीड महिना उलटूनही तपास संथ गतीने सुरु असल्याने आणि मुख्य आरोपी मोकाट फिरत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. फरार असलेल्या २१ आरोपींमध्ये अनेक कुख्यात गुन्हेगारांचा समावेश आहे. यातील अनेकांवर यापूर्वीच पाचपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी विशेष तपास पथके (Special Teams) नेमण्याची तातडीची गरज व्यक्त होत आहे.
या प्रकरणातील अनेक आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका – MCOCA) अंतर्गत कारवाई करून त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, प्रकरणाची व्याप्ती आणि गुंतलेल्या बड्या नावांचा विचार करता, याचा सखोल आणि निःपक्षपाती तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT – Special Investigation Team) नेमण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.या प्रकरणात पुढे पोलीस प्रशासन काय पाऊले उचलणार आणि फरार आरोपींना कधीपर्यंत जेरबंद करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फरार आरोपींची यादी:
१. विनोद उर्फ पिटू गंगणे – माजी नगराध्यक्ष पती
२. चंद्रकांत उर्फ बापू कणे – माजी नगराध्यक्ष, तुळजापूर
३. शरद रामकृष्ण जमदाडे – माजी सभापती
४. इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर – नळदुर्ग
५. स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग – तुळजापूर (माजी नगराध्यक्षांचा हस्तक)
६. वैभव अरविंद गोळे – मुंबई (आरोपी संगिता गोळे हिचा पती)
७. प्रसाद उर्फ गोटन कदम – परमेश्वर (तुळजापूर)
८. उदय शेटे
९. आबासाहेब गणराज पवार
१०. अलोक शिंदे
११. अभिजित गव्हाड
१२. विनायक इंगळे – तुळजापूर
१३. शाम भोसले – तुळजापूर
१४. संदीप टोले – तुळजापूर
१५. जगदीश पाटील – तुळजापूर
१६. विशाल सोंजी – तुळजापूर
१७. अभिजीत अमृतराव – तुळजापूर
१८. दुर्गेश पवार – तुळजापूर
१९. रणजीत पाटील – तुळजापूर
२०. नाना खुराडे – तुळजापूर
21. अर्जुन हजारे – उपळाई खुर्द, सोलापूर