तुळजापूर :आरोपी नामे-1)सुनिल पवार, 2) सोमा पवार, 3) बाळु शिंदे, 4) विकी मंडोळे, 5) यलाप्पा मंडोळे, 6) लक्ष्मण पवार, सर्व रा. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.03.04.2024 रोजी नविन बसस्थानक समोर फिर्यादी नामे- गंगाराम अनिल हजारे, वय 32 वर्षे, रा. मातंगनगर शुक्रवार पेठ तुळजापूर जि. धाराशिव, यांना विठभट्टीवरील विटाचे भाउ ठरण्यासाठी बोलावून घेवून गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, स्टीलचा कोयता, रॉडने मारहाण करुन जखमी केले.तसेच फिर्यादीचे एक तोळ्याचे अंगठी व खिशातील 2,115₹ काढून घेतले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे गंगाराम हजारे यांनी दि.08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 327, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अ.जा.ज.अ. प्र. कायदा कलम 3(2)(व्हि.अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :आरोपी नामे-सतीश दत्तु मोहिते, वय 45 वर्षे, रा. आरळी खु ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 08.04.2024 रोजी सकाळी 07.00 वा. सु. आरळी खु येथे फिर्यादी नामे-पांडुरंग दत्तु मोहिते रा. आरळी खु ता. तुळजापूर जि. धाराशिव र यांना नमुद आरोपींनी जमीन पडीक पाडण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दाताने चावा घेवून जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे पांडुरंग मोहिते यांनी दि. 08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे कलम 324, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :आरोपी नामे-कृष्णा दत्ता सोमवंशी, 2) बाळासाहेब उर्फ शाहुराज सिद्राम सोमवंशी दोघे रा. आरळी खु ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 02.04.2024 रोजी 21.30 वा. सु. आरळी खु येथे फिर्यादी नामे- सुग्रीव ज्ञानोबा दरेकर, वय 45 वर्षे, रा. आरळी खु ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुग्रीव दरेकर यांनी दि. 08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे-1)समाधान रामकिसन पिंपळे. 2) गोरोबा विजयकुमार पिंपळे, 3) विजयकुमार पांडुरंग पिंपळे, 4)श्रीकृष्ण रामकिसन पिंपळे, सर्व रा. वाघोली ता. जि. धाराशिव यांनी दि. 04.04.2024 रोजी 10.00 ते 10.30 वा. सु. वाघोली येथे फिर्यादी नामे- विक्रम विश्वनाथ मगर, वय 54 वर्षे, रा. वाघोली ता. जि. धाराशिव यांना व त्यांचा मुलगा वैभव मगर यांना माझे येड्याचे प्रमाणपत्र काढले आहे असे म्हाणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईप फायटरने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे विक्रम मगर यांनी दि.08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 325,324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.