• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पाण्याच्या वादातून ८२ वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण; ग्रामपंचायतीसमोर उचलून आपटले, चौघांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 9, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
602
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी : शेतातील बोरवेलचे तोंड उघडून पाणी का दिले, या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका ८२ वर्षीय वृद्धाला अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथे घडला आहे. वाद सोडवण्यासाठी आलेल्या पुतण्याला मारहाण करत, वृद्धाला ग्रामपंचायतीसमोर उचलून आपटण्यात आले. याप्रकरणी चौघांविरोधात बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बळीराम सोपान कोळगे (वय ८२, रा. केशेगाव, ता. जि. धाराशिव) असे गंभीर जखमी झालेल्या वयोवृद्ध फिर्यादीचे नाव आहे. मंगळवारी (ता. ७ एप्रिल) सकाळी ५ ते १० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. बळीराम कोळगे हे शेतात असताना आरोपींनी ‘बोरचे तोंड मुद्दामहून काढून पाणी का दिले’ अशी कुरापत काढत त्यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. यावेळी वाद पाहून भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पुतण्यालाही आरोपींनी सोडले नाही, त्यालाही मारहाण केली.

शेतातील वादानंतर आरोपींनी फिर्यादीचा मुलगा आणि सून यांना ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बोलावून घेतले. तेथे सर्वांसमक्ष पुन्हा शिवीगाळ करत ८२ वर्षीय बळीराम कोळगे यांना उचलून जमिनीवर आपटून फेकून दिले. वयोवृद्ध असल्याने या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत. इतक्यावरच न थांबता आरोपींनी त्यांच्या सुनेचा मोबाईल फोडून नुकसान केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

या गंभीर मारहाणीनंतर जखमी बळीराम कोळगे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी बुधवारी (ता. ८ एप्रिल) दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून बेंबळी पोलीस ठाण्यात श्रीराम गोपाळ (कोळगे), जयश्री श्रीराम कोळगे, बालाजी जगन्नाथ पवार आणि तानाजी जगन्नाथ पवार (सर्व रा. केशेगाव, ता. जि. धाराशिव) या चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११७(२), ११५(२), ३२४(४), ३५२, ३५१(२)(३) सह ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अमानुष मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.

Previous Post

राजकीय वादातून तरुणाचे अपहरण करून तलवारीने हल्ला; मोहा येथील घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

Next Post

तुळजापुरात पार्किंगमध्ये राडा; भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात पार्किंगमध्ये राडा; भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

ताज्या बातम्या

वारीत पांडुरंग भेटतो का?

वारीत पांडुरंग भेटतो का?

July 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्यात सिंदगाव तलावावरील तब्बल ५,५५० फूट केबल वायर लंपास!

July 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्यात कात्री गावामध्ये घरफोडी! ७५ हजारांचे दागिने लंपास करत चोरट्यांनी शेजाऱ्याची दुचाकीही पळवली

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हैदराबाद-पुणे महामार्गावर थरार! कारमध्ये आराम करणाऱ्या बिदरच्या मित्रांना चाकू-टॉमीचा धाक दाखवून लुटले

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्ग हद्दीत धक्कादायक घटना! शेतात काम करणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेला जिवे मारण्याची धमकी देत जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार

July 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group