• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात पार्किंगमध्ये राडा; भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

पाच जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

admin by admin
April 9, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
1.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : तुळजापूर शहरातील पार्किंग परिसरात एका तरुणाला होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या ३२ वर्षीय तरुणालाच लोखंडी पाईप, दगड आणि ‘फायटर’ने बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. यावेळी आरोपींनी तरुणाला जातीवाचक शिवीगाळही केली असून, याप्रकरणी पाच जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी (SC/ST Act) सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भगवान अनिल पारधे (वय ३२, रा. वेताळ नगर, तुळजापूर, जि. धाराशिव) असे या मारहाणीत जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे. रविवारी (ता. ५ एप्रिल) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील पार्किंग परिसरात गणेश कांबळे या तरुणाला काही मुले मारहाण करत असल्याची माहिती भगवान पारधे यांना मिळाली. ही माहिती मिळताच भगवान हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सुरू असलेले भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.

भांडण सोडवण्यासाठी आलेल्या भगवान पारधे यांनाच आरोपींनी लक्ष्य केले. गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपींनी त्यांना थेट जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी, हातातील फायटर, लोखंडी पाईप आणि दगडाने अमानुष मारहाण करून त्यांना जखमी केले.

या घटनेत जखमी झालेल्या भगवान पारधे यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी बुधवारी (ता. ८ एप्रिल) दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून तुळजापूर पोलीस ठाण्यात सुरज रसाळ, चिंता रसाळ, आशिष पवार, किरण गवते आणि अक्षय परमेश्वर (सर्व रा. तुळजापूर, जि. धाराशिव) या पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५२, १८९(२), १९१(२), १९१(३), ३५१(२) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) कलम ३(१)(आर), ३(१)(एस) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

Previous Post

पाण्याच्या वादातून ८२ वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण; ग्रामपंचायतीसमोर उचलून आपटले, चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

येरमाळ्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; दुचाकी, सोन्याची साखळी अन् लॅपटॉप लंपास; तीन गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

येरमाळ्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; दुचाकी, सोन्याची साखळी अन् लॅपटॉप लंपास; तीन गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

वारीत पांडुरंग भेटतो का?

वारीत पांडुरंग भेटतो का?

July 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्यात सिंदगाव तलावावरील तब्बल ५,५५० फूट केबल वायर लंपास!

July 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्यात कात्री गावामध्ये घरफोडी! ७५ हजारांचे दागिने लंपास करत चोरट्यांनी शेजाऱ्याची दुचाकीही पळवली

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हैदराबाद-पुणे महामार्गावर थरार! कारमध्ये आराम करणाऱ्या बिदरच्या मित्रांना चाकू-टॉमीचा धाक दाखवून लुटले

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्ग हद्दीत धक्कादायक घटना! शेतात काम करणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेला जिवे मारण्याची धमकी देत जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार

July 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group