• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अणदूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा ! माजी मंत्री मधुकरराव चव्हाण याचे नातू रणवीर चव्हाणांच्या ‘बिनविरोध’ स्वप्नाला ‘वंचित’चा ब्रेक!

admin by admin
January 24, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
अणदूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा ! माजी मंत्री मधुकरराव चव्हाण याचे नातू रणवीर चव्हाणांच्या ‘बिनविरोध’ स्वप्नाला ‘वंचित’चा ब्रेक!
0
SHARES
2.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

अणदूर : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो, याचा प्रत्यय सध्या तुळजापूर तालुक्यात येत आहे. निमित्त आहे पंचायत समिती निवडणुकीचे! अणदूर गणात सध्या असा काही ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ रंगलाय की, विचारता सोय नाही.

वडील काँग्रेसचे ‘वजीर’, पण मुलगा निघाला भाजपचा ‘शिलेदार’!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तब्बल पाच वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा तुळजापूर तालुका हा  बालेकिल्ला. पण काळ बदलला आणि समीकरणंही! मधुकरराव चव्हाणांचे सुपुत्र सुनील चव्हाण यांनी ‘श्री तुळजाभवानी कारखाना’ वाचवण्यासाठी थेट भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. विशेष म्हणजे, ज्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वडिलांचा (मधुकराव चव्हाण) पराभव केला, त्यांचेच नेतृत्व स्वीकारत सुनील मालकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

आता याच समीकरणातून सुनील मालकांचे सुपुत्र आणि मधुकररावांचे नातू रणवीर चव्हाण हे भाजपच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत.

‘ऑपरेशन बिनविरोध’ आणि ‘वंचित’चा दणका!

रणवीर चव्हाण यांची ही एन्ट्री ‘ग्रँड’ करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. त्यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या:

  • सुरुवातीला माजी ग्रामपंचायत सदस्या संजीवनी अरविंद आलुरे यांचे चिरंजीव आण्णासाहेब आलुरे यांचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाला.

  • त्यानंतर खरी खळबळ उडाली ती काँग्रेसच्या उमेदवाराच्या माघारीने! काँग्रेसचे उमेदवार ॲड. विशाल शेटे यांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या.

आर. एस. गायकवाड

मनसे नरमली, पण ‘वंचित’ नडली!

मैदान साफ करण्यासाठी मनसेचे उमेदवार पवन बसवराज घोगरे यांचीही मनधरणी सुरू आहे. पण, या सगळ्या डावात वंचित बहुजन आघाडीने मात्र मोठा ‘खोडा’ घातला आहे.

सगळे अडथळे दूर झाले असे वाटत असतानाच, वंचितचे उमेदवार आर. एस. गायकवाड हे मात्र आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले आहेत. “काहीही झाले तरी माघार नाही,” अशी भूमिका घेत गायकवाड यांनी रणवीर चव्हाणांच्या ‘बिनविरोध’ विजयाच्या रथाला जोरात ‘ब्रेक’ लावला आहे.

त्यामुळे आता अणदूर गणात ही निवडणूक सरळ होणार की वंचितच्या गुगलीमुळे सामना रंगणार? याकडे संपूर्ण तुळजापूरचे लक्ष लागले आहे.

Previous Post

भररस्त्यात तलवारीसह दहशत; परंडा पोलिसांची धडक कारवाई, तरुणावर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव: मौजे देवळाली येथे गांजाच्या शेतीवर ‘अँटी नार्कोटिक्स’चा छापा; १६ किलो गांजा जप्त, एकाला अटक

Next Post
धाराशिव: मौजे देवळाली येथे गांजाच्या शेतीवर ‘अँटी नार्कोटिक्स’चा छापा; १६ किलो गांजा जप्त, एकाला अटक

धाराशिव: मौजे देवळाली येथे गांजाच्या शेतीवर 'अँटी नार्कोटिक्स'चा छापा; १६ किलो गांजा जप्त, एकाला अटक

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा हैदोस! जळकोटमध्ये दुकानाचा पत्रा उचकटून ८ लाखांची घरफोडी; तुळजापुरात दागिने लंपास तर परंड्यात वाळू तस्कर जेरबंद

June 20, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंबमध्ये खळबळ! ‘बियर बार टाकायचा आहे’ म्हणून ६ तोळे सोने अन् १५ लाख लाटले; पैसे मागताच महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण

June 20, 2026
राजे, आम्हाला माफ करा…

राजे, आम्हाला माफ करा…

June 20, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव पोलिसांचा ‘शस्त्रधाऱ्यांना’ दणका! भूम, वाशी, आनंदनगर, आंबी आणि तामलवाडीत तलवारी अन् कोयत्यासह ५ जण जेरबंद

June 19, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

चोरट्यांचा सुळसुळाट! तुळजापुरातून स्कूटी गायब, तर सांजा शिवारातून सोलर पंप अन् वायर लंपास

June 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group