तुळजापूर :आरोपी नामे-1) कदम पुजारी व 5 अनोळखी इसम यांनी दि.07.02.2024 रोजी 15.46 वा. सु. परमेश्वर लॉज समोर घाटशिळ पार्कीग तुळजापूर येथे फिर्यादी नामे- राजेंद्र नरहारी पिंगटे, वय 60 वर्षे, रा. जयभवानी रोड शंकर नगर नाशिक रोड नाशिक ता. जि. नाशिक यांना व त्यांचे सोबतचे लोकांना श्री. तुळजाभवानीचे मंदीरात पुजा करण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राजेंद्र पिंगटे यांनी दि.07.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 143, 147, 324, 323, 504, 506, 427 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा :आरोपी नामे-1)दत्तु भिमा इटकर, 2) अंगद सुरेश भोसले, 3) परमेश्वर मच्छिंद्र पवार सर्व रा. सोनारी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.07.02.2024 रोजी तहसील कार्यालय परंडा आवारात परंडा येथे फिर्यादी नामे- किरण मोहन पवार, वय 37 वर्षे, रा. सोनारी ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी जमीनीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीने डोक्यात व हाताला मारुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- किरण पवार यांनी दि.07.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 326, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब :आरोपी नामे- अंकुश भिमा शिंदे, रा. कोठाळवाडी, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 06.02.2024 रोजी 16.30 वा. सु. कोठाळवाडी पारधी पिढीच्या रस्त्यावर फिर्यादी नामे-विजय बाजीराव शिंदे, वय 47 वर्षे, रा. कोठाळवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने जात पंचायतीचे पैसे देण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी सुरीने डोक्यात मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विजय शिंदे यांनी दि.07.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी :आरोपी नामे-1) सुजित शिवाजी हाउळ, 2) अच्युत शिवाजी हाउळ रा. जागजी ता. जि. धाराशिव यांनी दि. 05.02.2024 रोजी 20.00 वा. सु. जागजी येथे पाटील यांचे वट्यावर फिर्यादी नामे- शिवाजी शंकर हाउळ, वय 43 वर्षे, रा. जागजी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेत वाटणीचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड व कत्तीने बोटावर व डोक्यात मारहाण करुन जखमी करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शिवाजी हाउळ यांनी दि.07.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.