तुळजापूर: तुळजापूर पोलिसांनी सोमवारी 90 किलो गोवंशीय जनावरांचे मांस जप्त केले आणि चार जणांना अटक केली. आरोपी अब्दुल बुह्रान शेख, नासेर अब्बास कुरेशी, इरफान यासीन कुरेशी आणि अर्शद रहेमान कुरेशी हे सर्व धाराशिव येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे 17 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता आपआपल्या ताब्यातील रिक्षा आणि मोटरसायकलवरून 90 किलो गोवंशीय जनावरांचे मांस घेऊन जात होते. ते हे मांस विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे पोलिसांना आढळून आले.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून 1,58,500 रुपये किमतीचे मांस आणि वाहने जप्त केली. आरोपींविरुद्ध पशु संरक्षण अधिनियम कलम 5 (क) (9) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.