तुळजापूर – येथील जुन्या बस स्थानकाजवळील परिसरात 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास गणेश सुरेश पाटील यांच्या मालकीची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. गणेश पाटील हे धाराशिव जिल्हा कारागृहात शिपाई म्हणून कार्यरत असून त्यांचे राहते ठिकाण आनंदनगर, धाराशिव आहे.
फिर्यादी गणेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हिरो कंपनीची एचएफ डिलक्स (MH25AG2546) मोटारसायकल, ज्याची अंदाजे किंमत 25,000 रुपये आहे, अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. मोटारसायकल काळ्या रंगाची असून त्यावर लाल पट्टा आहे.
या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गु.र.न 484/2024 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास हवालदार कामतकर (HC/151) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मोटारसायकलचा शोध घेण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात पोलिसांची मोटारसायकल लंपास करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी अधिक तपास सुरू केला आहे.