तुळजापूर: मुंबईहून श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या ३२ वर्षीय महिलेची पुजाऱ्याने २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्वरिता संजय सिंह असे या फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून त्या विक्रोळी, मुंबई येथील रहिवासी आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी त्या तुळजापूर येथे दर्शनासाठी आल्या होत्या.
त्वरीता संजय सिंह (वय ३२, रा. विक्रोळी, मुंबई) या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, विवेक लोंढे नावाच्या व्यक्तीने स्वतःला तुळजापूर श्री तुळजाभवानी संस्थानचा ट्रस्टी असल्याचे खोटे सांगून त्यांची दिशाभूल केली. लोंढे यांनी पूजा विधीसाठी लागणाऱ्या साहित्याबाबत खोटी माहिती देऊन १०,००० रुपये लागतील असे सांगितले. त्यानंतर त्यांनी २२,८०१ रुपयांचे बिल देऊन सिंह यांची फसवणूक केली.
या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी नामे-त्वरीता सिंह यांनी दिलेल्या तक्रारीवरून भा.न्या.सं.कलम 204, 318(2), 319(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी त्वरिता संजय सिंह ( वय -32 वर्षे ) या विक्रोळी ईस्ट, मुंबई येथे मेकअप अर्टीस्ट म्हणून व्यवसाय करतात. त्यांनी तुळजाभवानी पुजाऱ्याविरुद्ध फिर्याद दाखल करून चांगलाच मेकअप उतरविला आहे.