• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, April 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘Left’ नाही, तर थेट ‘Removed’! तुळजापूर पोलिसांच्या ग्रुपमध्ये ‘डिजिटल’ बंड

admin by admin
February 15, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी
0
SHARES
2.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: “एरवी पोलीस ठाण्यात गुन्हेगारांना पोलिसांचा ‘खाक्या’ दाखवला जातो, पण तुळजापूर पोलीस ठाण्यात चक्क आपल्याच सहकाऱ्यांना ग्रुपमधून ‘बाहेरचा रस्ता’ दाखवण्यात आला आहे! साहेबांच्या ‘हलक्या काना’मुळे आणि खाजगी ‘वसूलदारा’च्या अतिउत्साहामुळे सध्या तुळजापूर पोलिसांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक आगळावेगळा ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राईक’ पाहायला मिळाला आहे.

झाले असे की, तुळजापूर पोलीस स्टेशनच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर दररोजचे अपडेट्स पडत असतात. पण गेल्या महिन्यात अचानक या ग्रुपमधील वातावरण तापले. पोलीस निरीक्षकांचे (PI) लाडके आणि विश्वासू ‘वसूलदार’ (जे अधिकृत पोलीस कमी आणि साहेबांचे पीए जास्त वाटतात) यांनी एका सपोनि (API) आणि एका हेड कॉन्स्टेबलला ग्रुपमधून तडकाफडकी ‘रिमूव्ह’ (Remove) केले.

कारण विचाराल तर अधिकृत काहीच नाही! पण पोलीस ठाण्याच्या कट्ट्यावर जी कुजबूज आहे, त्यानुसार साहेबांना शंका होती की हे दोघे ‘घरचे भेदी’ आहेत. म्हणजे ठाण्यातील आतल्या बातम्या हे स्थानिक पत्रकारांना पुरवतात, असा संशय! साहेबांचे कान कच्चे असल्याने त्यांनी शहानिशा न करता या दोघांचा “डिजिटल एन्काऊंटर” करण्याचे आदेश दिले आणि वसूलदाराने ‘रिमूव्ह’ बटण दाबून कामगिरी फत्ते केली.

पण ज्यांना काढले, ते काही साधे सुधे नव्हते. त्यांनी थेट “आम्ही ग्रुपमधून लेफ्ट झालो नाही, तर आम्हाला काढले!” अशी तक्रार घेऊन पोलीस अधीक्षक (SP) मॅडमचे दार ठोठावले. आता हे प्रकरण साध्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून थेट चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे.

या प्रकरणाची चौकशी धाराशिवच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे (SDPO) सोपवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात तुळजापूरचे ‘कानाचे कच्चे’ पोलीस निरीक्षक आणि त्यांचे ‘डिजिटल’ वारसदार (वसूलदार) यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

आता या “रिमूव्ह प्रकरणामुळे” कोणाची खुर्ची हालणार आणि कोणाला पुन्हा ग्रुपमध्ये ‘ॲड’ केले जाणार, याकडे संपूर्ण तुळजापूरचे आणि पत्रकारांचे लक्ष लागले आहे.


Previous Post

कत्तलीसाठी जनावरांची निर्दयतेने वाहतूक; आंबी पोलिसांची कारवाई, २ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

धाराशिव जिल्हा परिषद: सत्तेच्या सारीपाटावर ‘महायुती’तच महायुद्ध…

Next Post
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव जिल्हा परिषद: सत्तेच्या सारीपाटावर 'महायुती'तच महायुद्ध...

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेतातील २८ हजारांची केबल चोरीला; नळदुर्ग पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

April 5, 2026
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाची धडक; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

April 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

दारूच्या नशेत स्वतःच्या वडिलांसह भावाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ईट येथील धक्कादायक घटना

April 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

येणेगूर येथे ट्रॅक्टर लावण्याच्या वादातून राडा; मध्यस्थी करणाऱ्या महिलेचे दगडाने मारून पाडले ५ दात

April 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

येरमाळ्यात पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; शासकीय कामात अडथळा, सात जणांवर गुन्हा दाखल

April 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group