• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतातील २८ हजारांची केबल चोरीला; नळदुर्ग पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून ५५ लाखांचे नुकसान; दोन लाखांचे साहित्य चोरीला

admin by admin
April 5, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील निळेगाव शिवारातील एका शेतातून तब्बल २८ हजार रुपये किमतीची केबल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपी व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश दशरथ जमादार (वय ४७, रा. निळेगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या निळेगाव शिवारातील शेतातून ३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञातांनी ११२५ फूट लांबीची केबल (अंदाजे किंमत २८,१२५ रुपये) चोरून नेली. याप्रकरणी प्रकाश जमादार यांनी शनिवारी (ता. ४ एप्रिल) नळदुर्ग पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरीवरून बबन चंदर काळे आणि सागर जयराम भोसले (दोघे रा. डिकमल पारधी पिढी, धाराशिव) व त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.


ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून ५५ लाखांचे नुकसान; दोन लाखांचे साहित्य चोरीला

वाशी : वाशी तालुक्यातील सरमकुंडी, दसमेगाव आणि कनेरी शिवारात एका कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून तब्बल ५५ लाख रुपयांचे मोठे नुकसान केल्याची आणि दोन लाखांहून अधिक किमतीचे साहित्य चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शंकर नेटके (वय ३४, रा. भिसरे, ता. करमाळा, जि. सोलापूर, ह.मु. विकास नगर, धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सरमकुंडी, दसमेगाव व कनेरी शिवारात सेरेंटिका रिन्यूएबल इंडिया ४, ५ प्रा. लि. कंपनीचे काम सुरू आहे. १२ डिसेंबर २०२५ ते २४ मार्च २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणचे वायंडिंग वायर, इलेक्ट्रिक रॉड, सीएसएस रॉड, बस बार, तांब्याचे इलेक्ट्रिक रॉड आणि १२०० लिटर ट्रान्सफॉर्मर ऑइल असा एकूण २ लाख ९ हजार रुपयांचा माल चोरून नेला.

तसेच, चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरवरील एम.एस. प्लेट, बॉक्स, सीएनएस आणि पॅनल तोडून व फोडून कंपनीचे अंदाजे ५५ लाख रुपयांचे नुकसान केले आहे. याप्रकरणी रोहित नेटके यांनी शनिवारी (ता. ४ एप्रिल) वाशी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि ३२४(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मोठ्या चोरीचा व तोडफोडीचा अधिक तपास वाशी पोलीस करत आहेत.

Previous Post

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाची धडक; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Next Post

येडेश्वरी यात्रेत भामट्यांचा सुळसुळाट! मारहाण करून लूट; तर कार फोडून ९५ हजारांची रोकड पळवली

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

येडेश्वरी यात्रेत भामट्यांचा सुळसुळाट! मारहाण करून लूट; तर कार फोडून ९५ हजारांची रोकड पळवली

ताज्या बातम्या

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

October 18, 2026
हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

October 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026

Recent Posts

  • ‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!
  • हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा
  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!