• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येडेश्वरी यात्रेत भामट्यांचा सुळसुळाट! मारहाण करून लूट; तर कार फोडून ९५ हजारांची रोकड पळवली

admin by admin
April 6, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
344
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा : येथील प्रसिद्ध येडेश्वरी देवीच्या यात्रेमध्ये एकाच रात्रीत लुटमार आणि चोरीचे दोन गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. आमराई परिसरात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या दोघांना काठीने बेदम मारहाण करून लुटण्यात आले. तर दुसऱ्या एका घटनेत, एका व्यक्तीची कार फोडून तब्बल ९५ हजारांची रोकड लंपास करण्यात आली आहे. या दोन्ही घटना शनिवारी (ता. ४) रात्री घडल्या असून, रविवारी (ता. ५) येरमाळा पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नैसर्गिक विधीसाठी गेलेल्यांना बेदम मारहाण अन् लूट

पहिल्या घटनेत, गोरोबा कोंडीबा गायके (वय ४९, रा. वडार गल्ली, येरमाळा, ता. कळंब) हे त्यांच्या नातेवाइकांसह यात्रेसाठी आले होते. शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास आमराई येथील दगडी हौदाच्या पश्चिमेकडील मोकळ्या जागेत ते नैसर्गिक विधीसाठी गेले होते. यावेळी तेथे अचानक आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांना काठीने मारहाण केली व त्यांच्या खिशातील ५ हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यांच्यासोबत असलेले लिंबराज कोकाटे यांनाही या चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील ७ हजार रुपये आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला. याप्रकरणी गोरोबा गायके यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारचे लॉक तोडून ९५ हजारांवर डल्ला

दुसऱ्या घटनेत, विशाल निळकंठ बारकुल (वय ३६, रा. येरमाळा) हे देखील शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास यात्रेत आले होते. त्यांनी आपली कार आमराई परिसरात लावली होती. कारमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि ९५ हजार रुपयांची रोकड ठेवून त्यांनी कार लॉक केली व ते पाळण्याजवळ गेले. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कारच्या दरवाजाचे लॉक तोडून (ज्यामुळे ३ हजारांचे नुकसान झाले) आतील ९५ हजारांची रोख रक्कम चोरून नेली. विशाल बारकुल हे परत आले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांच्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(२), ३२४(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

यात्रेसारख्या गर्दीच्या ठिकाणी एकाच रात्रीत घडलेल्या या दोन घटनांमुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, येरमाळा पोलिस या दोन्ही घटनांमधील अज्ञात आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

Previous Post

शेतातील २८ हजारांची केबल चोरीला; नळदुर्ग पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

शेतबांधावरील काट्या उचलण्याच्या कारणावरून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण; बुकनवाडी येथील घटना

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतबांधावरील काट्या उचलण्याच्या कारणावरून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण; बुकनवाडी येथील घटना

ताज्या बातम्या

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

July 12, 2026
मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

July 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

July 12, 2026
पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

July 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group