तुळजापूर : हडको येथे रस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेत आठ जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजाभाउ माने (५३) यांना घराकडे जाण्या-येण्याच्या रस्त्यावरून आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, विटा, लोखंडी घनाने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.
या प्रकरणी सतिश सरडे, जयश्री सरडे, श्रद्धा सरडे, भाग्यश्री इंगळे, शंभु सरडे, किरण इंगळे, किरण इंगळे यांची आई आणि विशाल विजय छत्रे यांच्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत घडली. फिर्यादी राजाभाउ माने यांनी ९ सप्टेंबर रोजी याबाबत पोलिसात तक्रार दिली. माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 189(2), 191(2), 191(3), 190, 126(2), 49, 118(1), 115(2), 324(4), 352, 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.