तुळजापूर – महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला राजकीय पक्षांनी जोरदार सुरुवात केली आहे. तुळजापूर मतदारसंघ, ज्यामध्ये तुळजापूर तालुक्यातील १०८ गावे आणि धाराशिव तालुक्यातील ७२ गावे समाविष्ट आहेत, येथे या वेळी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांनी काँग्रेसचे चार वेळा आमदार राहिलेल्या मधुकरराव चव्हाण यांचा पराभव करून विजय मिळवला होता. राणा पाटील यांची राजकीय कारकीर्द लक्षात घेता, त्यांनी निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
यंदा काँग्रेसकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील, अणदूरचे सरपंच आणि स्व. आलुरे गुरुजी यांचे पुतणे रामदादा आलुरे यांचे नाव चर्चेत आहे. याशिवाय राष्ट्रवादी ( शरद पवार ) पक्षाकडून जीवनराव गोरे, उद्योजक अशोक जगदाळे इच्छूक आहेत. देवानंद रोचकरी, अण्णासाहेब दराडे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात.
भाजपकडून राणा पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असूनही ऍड. व्यंकट गुंड आणि ऍड. अनिल काळे यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. यामुळे भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
यावेळी तुळजापूर मतदारसंघात स्थानिक आणि प्रादेशिक राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत. मतदारसंघातील विविध सामाजिक आणि आर्थिक समस्यांवर उमेदवारांनी काय उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत, यावर मतदारांचा निर्णय अवलंबून राहील. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत रोमांचक आणि चुरशीची होणार आहे.
तुळजापूर तालुक्यातील गावे
आलियाबाद, अमृतवाडी, अणदूर , आपसिंगा, आरळी बुद्रुक, आरळी खुर्द, आरबाळी, बाभळगाव, बारूळ, बसवंतवाडी, भातांब्री, बिजनवाडी, बोळेगाव, बोरगाव, बोरी, बोरनाडवाडी, चव्हाणवाडी, चिकुंद्रा, चिंचोळी, चिवरी, दहिटणा, दहीवाडी, देवकुरळी, देवसिंगा, धानेगाव, धनगरवाडी, ढेकरी, धोत्री, दिंडेगाव, फुलवाडी, गांजेवाडी, गवळेवाडी, घांडोरा, घाट्टेवाडी, गोंधळवाडी, गुजणूर, गुलहळ्ळी, हगलूर, हंगरगा, हिप्परगताड, होनाळा, होरटी, इंदिरानगर, इटकळ, जाळकोट, जाळकोटवाडी, जवळगा, मेसाई, कदमवाडी, काकरांबा, काकरांबावाडी, काळेगाव, कामठा, कार्ला, कासई, काटगाव, काटी, काटरी, केमवाडी, केरूर, केशेगाव, खडकी, खानापूर, खंडाळा, खुडावाडी, खुट्टेवाडी, किळज, कोरेवाडी, कुंभारी, कुणसावळी, लोहगाव, माळुंब्रा, मानेवाडी, मंगरूळ, मानमोडी, मासळा खुर्द, मोरडा, मुरटा, नळदुर्ग, नांदगाव, नांदुरी, निळेगाव, पांगरदरवाडी, पिंपळा बुद्रुक, पिंपळा खुर्द, रायखेळ, रामतीर्थ, सालगारादिवटी, सालगारातातुर, सांगवीकाटी, सांगवीमारदी, सारटी, सरडेवाडी, सारोळा, सावरगाव, शहापूर, शिरढोण, शिरगापूर, शिवाजीनगर, शिवकरवाडी, सिंदफळ, सिंदगाव, सुरतगाव, ताडवळा, तामलवाडी, तेलारनगर, तीर्थ बुद्रुक, तीर्थ खुर्द, तुळजापूर, उमरगा, वडाचातांडा, वडगावदेव, वडगावकाटी, वडगावलाख, वागदरी, वाणेगाव, वाणेवाडी, यमगरवाडी, येडोळा, येवती.
तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट
– सिंदफळ – काक्रंबा – मंगरूळ – काटी – अणदूर – जळकोट – नंदगाव – शहापूर – चिवरी