येरमाळा: येरमाळा पोलीस ठाण्यात शिवाजी जाधवर, गणेश जाधवर आणि इतर सहा अनोळखी इसमांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अशोक बळीराम जाधवर यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या मित्र राजू जाधवर यांना मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि काचेच्या बाटलीने मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
आरोपी नामे- शिवाजी जाधवर, गणेश जाधवर व इतर 6 अनोळखी इसम यांनी दि. 29.08.2024 रोजी 22.30 वा. सु. येरमाळा ते बीड जाणारे एन एच 52 रोडलगत रत्नापूर शिवारातील चंदन बिअरबार येथे फिर्यादी नामे- अशोक बळीराम जाधवर, वय 30 वर्षे, रा. रत्नापूर ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,काचेच्या बॉटलने मारहाण करुन जखमी केले. त्यावर फिर्यादीचा मित्र राजु जाधवर हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अशोक जाधवर यांनी दि.30.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1),115(2), 352, 351(2), 189(2), 190, 191(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग: नळदुर्ग पोलीस ठाण्यात सद्दाम पापा शेख याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार बळीराम दादाराव लोमटे यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने त्यांना दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कानाला चावा घेतला. हा प्रकार 22 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9.30 वाजता सलगरा गावातील बसस्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडला.
आरोपी नामे- सद्दाम पापा शेख, सलगरा दि., ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 22.08.2024 रोजी 21.30 वा. सु. सलगरा गावातील बसस्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फिर्यादी नामे- बळीराम दादाराव लोमटे, वय 36 वर्षे, रा.सलगरा दि., ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने दारु पिण्यासाठी पैसे का दिले नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन कानाला चावा घेवून गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बळीराम लोमटे यांनी दि.30.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 117(2), 115(2), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.