उमरगा – उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील 70 वर्षीय उत्तमबाई श्रीरंग जाधव यांची लक्ष्मी मंदिरात दोन अनोळखी इसमांनी 25,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या जिरामणीची फसवणूक केल्याची घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमबाई जाधव या 6 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता लक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दोन अनोळखी इसम मंदिरात आले आणि त्यांनी उत्तमबाईंना 100 रुपयांची नोट काढून त्यात त्यांच्या गळ्यातील सोन्याची जिरामणी बांधून ठेवण्यास सांगितले. उत्तमबाईंनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपली सहा ग्रॅम वजनाची सोन्याची जिरामणी कॅरीबॅगमध्ये ठेवली. त्याचवेळी आरोपींनी कॅरीबॅगमधील जिरामणी चोरून पळ काढला.
या घटनेनंतर उत्तमबाई जाधव यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम 381(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.