• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरग्यातील गुरुवाडीत तरुणावर जीवघेणा हल्ला; स्टील पाईप, हंटरने केली मारहाण, सहा जणांवर गुन्हा

admin by admin
August 1, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
572
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : उमरगा तालुक्यातील गुरुवाडी येथे एका ३२ वर्षीय तरुणाला सहा जणांच्या टोळक्याने घेरून स्टील पाईप, हंटर आणि दगडांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवाडी येथील रहिवासी अविनाश नाशीवंत लिंबारे (वय ३२) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी, ३० जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गावातील महादेव मंदिराजवळ घडली. अविनाश लिंबारे हे मंदिराजवळ असताना आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवून त्यांना अडवले.

यावेळी आरोपी महादेव राम गायकवाड, सुनिल गायकवाड, रमेश गायकवाड, सतिष गायकवाड, भिम गायकवाड आणि व्यंकट गायकवाड (सर्व रा. गुरुवाडी) यांनी अविनाश यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी स्टील पाईप, हंटर, लाकडी फळी आणि दगडांनी अविनाश यांना जबर मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेनंतर अविनाश लिंबारे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार दंगल माजवणे, मारहाण करणे, आणि जीवे मारण्याची धमकी देणे या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

लोहाऱ्यात ‘टाटा पॉवर’च्या कर्मचाऱ्यांवर खंडणीसाठी जीवघेणा हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव तालुक्यातील खेडमध्ये किराणा दुकानावर छापा, ९ हजारांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त

Next Post
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिव तालुक्यातील खेडमध्ये किराणा दुकानावर छापा, ९ हजारांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात शेतकऱ्यांना मोठा फटका! उमरगा चिवरी तलावावरील ५ शेतकऱ्यांची ८४ हजारांची इलेक्ट्रिक वायर लंपास

June 7, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंड्यात अन्न व औषध प्रशासनाचा महाछापा! तीन गोदामांतून तब्बल १ कोटींहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त

June 7, 2026
धाराशिवमध्ये सोलर अन् पवनचक्कीचे साहित्य चोरणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १० गुन्हे उघड

धाराशिवमध्ये सोलर अन् पवनचक्कीचे साहित्य चोरणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १० गुन्हे उघड

June 7, 2026
YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group