उमरगा: शेतीच्या वादातून एका महिलेसह तिच्या मुलांना मारहाण करून जखमी केल्याची घटना उमरगा तालुक्यातील बोरी गावात घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिता अनिल पांचाळ (वय ३९ वर्षे, रा. नाईकचाकुर, हल्ली रा. राजगड कॉलनी, गणेश पेस्टीज, काळेवाडी, पुणे) यांना व त्यांच्या मुलगा-मुलीला राम मदने, तानाजी राम मदने, बालाजी राम मदने, नेताजी राम मदने, पल्लवी तानाजी मदने, आशा नेताजी मदने, रेश्मा बालाजी मदने (सर्व रा. बोरी) यांनी शेतीच्या वादातून मारहाण केली.
दि. ४ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास बोरी शिवारातील शेत गट क्रमांक १३४ मध्ये ही घटना घडली. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून सुनिता पांचाळ यांना व त्यांच्या मुलांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, दगड आणि ऊसाने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी सुनिता पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(१) (२), ७४, १८९(२), १९१(२), १९१(३), १९० सह पोक्से ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.