उमरगा – एका व्यक्तीस लाथाबुक्यांनी, चौकटीच्या फळीने मारहान करुन खून करणाऱ्या सहा आरोपीना जन्मठेप व कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल अतिरिक्त व सत्र न्यायाधीश उमरगा, यांनी दिला.
आरोपी नामे-1) अबुतालिब फकीर उर्फ मकानदार, 2) रियाज फकीर उर्फ मकानदार, 3) फैयाज फकीर उर्फ मकानदार , 4)जाकीर मुन्ना शेख, 5) मुजम्मील उर्फ मुजूब गौसउद्दीन मुगळे, सर्व रा. दाळिंब, ता. उमरगा जि. धाराशिव 6) तौफीक महम्मद काझी रा. मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव या सहाजनांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चौकटीच्या फळीने मारहान करुन जिवे ठार मारल्याने त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. सं. कलम- 302, 143, 147, 148, 149, 323, 504 अन्वये मुरुम पोलीस ठाण्यात गुरनं. 177/2020 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आर.एम. जगताप, एस.एस. बिराजदार, पोलीस उप निरीक्षक, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक एम जी शेंडगे यांनी करुन जिल्हा व सत्र न्यायदंडाधिकारी उमरगा यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याचा निकाल काल दि. 06.03.2024 रोजी जाहिर झाला. यात नमूद सहा आरोपींस भा.दं.वि.सं. कलम- 302, 143,147,148,149,323 या कलमांच्या उल्लंघनाबद्दल कलम 302, 149 नुसार जन्मठेप व प्रत्येकी 5,000₹ दंड व दंड न भरल्यास सश्रम कारावास, कलम 143 नुसार सहा महिने साधी कैद, कलम 147 नुसार 2 वर्षे सक्त मजुरी, कलम 148 नुसार 3 वर्षे सक्त मजुरी, कलम 323 नुसार 1 वर्षे साधी कैद व 5,000₹ प्रत्येकी दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद दंडाची शिक्षा सुनावली आहे.विशेष सरकारी वकील- श्री. एस.एम देशपांडे यांनी सदर केसची सरकारी पक्षा तर्फे कामकाज पाहिले.