• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 30, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाशी तालुक्यात महिलेवर घरात घुसून जीवघेणा हल्ला

सोन्याचे गंठण हिसकावले; पाच जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 12, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
273
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी – पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी घरात घुसून एका महिलेला लोखंडी रॉडने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील बोरी येथे घडली आहे. आरोपींनी हल्ला करताना महिलेच्या गळ्यातील सुमारे पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठणही हिसकावून नेले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ५ एप्रिल रोजी सकाळी घडली होती.

या प्रकरणी पीडित महिला सुवर्णा सुनिल पवार (वय ४५, रा. बोरी, ता. वाशी) यांनी ११ एप्रिल २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ५ एप्रिल रोजी सकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास, रमाकांत प्रभाकर सानप, उमाकांत प्रभाकर सानप, राजकुमार तुकाराम सानप, मारुती तुकाराम सानप आणि प्रभाकर ज्ञानोबा सानप (सर्व रा. नांदगाव, ता. वाशी) यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून, जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गैरकायदेशीर जमाव जमवला.

आरोपी सुवर्णा पवार यांच्या घरात घुसले आणि त्यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. या हल्ल्यात सुवर्णा पवार गंभीर जखमी झाल्या. हल्लेखोरांनी यावेळी त्यांच्या गळ्यातील अंदाजे पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून घेतले आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देत निघून गेले.

सुवर्णा पवार यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (जीवघेणा हल्ला), ७६, ११९(१), ३३३ (लूट), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(१) (घरात घुसखोरी), १९१(२), १९० (धमकी देणे, जमाव जमवणे इत्यादी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

घाटंग्रीत तरुणासह कुटुंबाला बेदम मारहाण; १५ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

कळंब: भजनात अडथळा आणण्यास विरोध केल्याने कुटुंबावर हल्ला

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

कळंब: भजनात अडथळा आणण्यास विरोध केल्याने कुटुंबावर हल्ला

ताज्या बातम्या

मनरेगा वैयक्तिक सिंचन विहिरींचे अनुदान विनाअट द्या; आमदार कैलास पाटील यांची मागणी

मनरेगा वैयक्तिक सिंचन विहिरींचे अनुदान विनाअट द्या; आमदार कैलास पाटील यांची मागणी

June 30, 2026
‘मातोश्री’च्या तोफा, मल्लूची पाकिटे आणि ‘नागपूरकर सरदारांचा’ गेम!

‘मातोश्री’च्या तोफा, मल्लूची पाकिटे आणि ‘नागपूरकर सरदारांचा’ गेम!

June 30, 2026
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

मावस भावाचा कोयत्याने वार करून खून करणाऱ्या नराधम आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

June 29, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग : सव्वा लाखांच्या प्रतिबंधित गुटखा साठ्यासह ‘अ‍ॅक्टिव्हा’ जप्त, सोलापूरचे दोन तस्कर जाळ्यात

June 29, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

ढोकीत किराणा दुकानाचे पत्रे उचकटून पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास

June 29, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group