धाराशिव – पवन चक्कीचे कॉपर वायर चोरी करणाऱ्या चोरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून पुढील तपासासाठी वाशी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अनिल उर्फ बापु दत्ता पवार रा. कोठाळवाडी ह.मु. उंबरा पारधी पिढी ता. कळंब जि. धाराशिव यांनी त्याचे राहते घराचे पाठीमागे पोत्यामध्ये काहीतरी चोरीच्या वस्तु लपवून ठेवल्या आहेत. व तो सध्या त्याच्या घरात आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन पोलीस पथकाने नमुद ठिाकणी जावून त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव अनिल उर्फ बापु दत्ता पवार, वय 24 वर्षे, रा. कोठाळवाडी ह.मु. उंबरा पारधी पिढी ता. कळंब जि. धाराशिव असे सागिंतले.
त्यास पथकाने त्याचे घराचे पाठीमागे घेवून गेले असता पथकास पांढरे रंगाचे एका खाताच्या पोत्यामध्ये कॉपर वायर मिळून आली. कॉपर वायर बाबत त्याच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, मी व माझ्या सोबत अन्य 10 ते 15 लोकांनी मिळून मागील वर्षी व चालू वर्षात यसवंडी, घाटपिंप्री, सारोळा, तसेच घाटनांदूर या गावाचे शिवारातील पवनचक्कीचे कॉपर वायरच्या चोऱ्या केल्या आहेत. त्या चोऱ्यातील माझे वाटणीला आलेली वायर आहे असे सागिंतले त्यावरुन पथकाने गुन्हे अभिलेखाची पाहणी केली असता सदर कॉपर वायर बाबत पोलीस ठाणे वाशी येथे गुरनं 1) 188/2024 भा.दं.वि.सं. कलम 379, 427, 2) गुरनं 171/2024 भा.दं.वि.सं. कलम 379, 3) गुरनं79/2024 भा.दं.वि.सं. कलम 379, 4)गुरनं 151/2023 भा.दं.वि.सं. कलम 379, 427 5) गुरनं 187/2024 भा. न्या. सं. कलम 303(2),324(4), 3(5) प्रमाणे गुन्हे नोंद असुन दोन पंचा समक्ष नमुद आरोपीच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील कॉपर वायर एकुण 2, 12, 000 ₹ किंमतीचे दि. 06.07.2024 रोजी 01.50 जप्त करुन पुढील कार्यवाही कामी नमुद आरोपीस वाशी पोलीसांच्या ताब्यात दिले. इतर आरोपीचा व मुद्देमालाचा शोध सुरु आहे.