वाशी : दि.09.05.2024 रोजी 00.10 ते 01.30 वा. सु. येशवंडी शिवारातील पवन चक्की चे टॉवर क्र 348 चे कंपनीचे अज्ञात व्यक्तीने रिनीव पॉवर कॉपर केबल 110 फुट,कंन्ट्रोल पॅनलचे साहित्य 15,000₹ असा एकुण 48, 000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. व इतर मालाची तोडफोड करुन दोन लाख रुपयाचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवाजी चत्रभुज आहेर, वय 43 वर्षे, व्यवसाय सिक्युरिटी गार्ड रा. डोकेवाडी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.06.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 379, 427 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव: अविनाश अमोल माने, वय 21 वर्षे, अनसुर्डा ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹किंमतीची हिरो स्पेलंडर मोटरसायकल क्र एमएच 25 एबी 6645 जिचा इंजिन नं HA10EJEHH76664, चेसी नं MBLHA10AMEHH87468 ही दि. 30.06.2024 रोजी 12.20 वा. सु. नाझ हॉटेल चे समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अविनाश माने यांनी दि.06.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : फिर्यादी नामे-प्रशांत सुनिल पाटील,, वय 36 वर्षे, रा. निपाणी ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची होंडा कंपनीची सी.बी.शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 ए.एम 6278 जिचा चेसी नं ME4JC657MHT066404 व इंजिन नं JC65ET1227515 ही दि. 29.06.2024 रोजी 24.00 ते 06.00 वा. सु. प्रशांत पाटील यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रशांत पाटील यांनी दि.06.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रस्ता अपघात
ढोकी : मयत नामे-अभिजीत दत्ता आदमाने, वय 18 वर्षे, व सोबत दिशांत आदमाने रा. जयभावानी नगर ढोकी ता. जि. धाराशिव हे दोघे दि.25.06.2024 रोजी 16.00 वा. सु. पेट्रोलपंप चौक ढोकी येथुन मोटरसायकल क्र एमएच 25 ए.झेड 9927 वरुन राजलक्ष्मी मंगल कार्यालय येथे लग्नाचे ठिकाणी जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 45 क्यु 8436 चा चालकाने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून अभिजीत आदमाने यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात अभिजीत आदमाने हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच दिंशात माणिक आदमाने हे व नमुद मोटरसायकल चालक स्वता गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-एकनाथ मुकूंद आदमाने, वय 35 वर्षे, रा. जयभवानी नगर ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.06.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं.कलम 279, 337, 338, 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.