वाशी : फिर्यादी नामे- संदीप बळीराम आहेर, वय 30 वर्षे, रा. डोकेवाडी ता. भुम जि. धाराशिव व त्यांचे चुलते अर्जुन सदाशिव आहेर यांचे राहाते घराचे कुलूप अनोळखी तीन व्यक्तीने दि.03.01.2024 रोजी 11.30 ते 12.45 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन दोघांचेही घरातील 27 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 03,87, 500₹ असा एकुण 10,62,500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संदीप आहेर यांनी दि.04.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 454,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-सुर्यकांत श्रीकृष्ण जाधव, वय 38 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव यांचे येडशी येथील पृथ्वी पंप्स दुकानातील व आनंद पानटपरी मधील फालीगोल्ड बंडल वायर 06 पितली बुश, एल.एडी टिव्ही, बाबा जाफराणी पत्तीचे 2 डब्बे, रत्ना 300- डब्बा 1, ब्रिस्टॉल सिगारेट 10 पॉकेट, गोल्ड फे्लक सिगारेट 8 पॉकीट, आईस बस्ट सिगारेट 6 पॉकीट व होमथेअटर 4 साउंड असा एकुण 1,01,695 ₹ किंमतीचा माल हा दि.30.12.2023 रोजी 11.00 ते दि. 31.12.2023 रोजी 05.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुर्यकांत जाधव यांनी दि.04.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 461, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भूम : फिर्यादी नामे-बाबासाहेब शिंदे, वय 33 वर्षे, रा. विजयनगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची काळ्या व लाल रंगाची एच एफ डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 25 एसी 0281 यांची व रामेश्वर प्रभु बावकर, रा. आगळगाव ता. बार्शी जि. सोलापूर यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची काळ्या व लाल रंगाची एच एफ डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 14 एच आर 6485 या दोन्ही मोटरसायकल दि.29. 12.2023 रोजी 20.30 ते दि. 30.12.2023 रोजी 11.00 वा. सु. ओंकार चौक भुम येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाबासाहेब शिंदे यांनी दि.04.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.