वाशी : फिर्यादी नामे-नितीन फुलचंद गायकवाड, वय 40 वर्षे, रा. सरमकुंडी त. वाशी जि.धाराशिव हे राहते घराला कुलूप लावून शेतात गेले असता अज्ञात व्यक्तीने नितीन गायकवाड यांचे घराचे कुलूप दि.22.05.2024 रोजी 10.00 ते 15.15 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 181 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे असे एकुण 3,62,000₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या नितीन गायकवाड यांनी दि. 23.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 354, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : फिर्यादी नामे-गोविंद केशव पाडे, वय 43 वर्षे, र. पिंपरी ता. कळंब जि. धाराशिव व त्यांचे शेजारी राहाणारे- श्रीपती काळे, प्रताप पाडे व गोपाळ केशव पाडे यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 23.05.2024 रोजी 02.00 ते 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 2,12,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या गोविंद पाडे यांनी दि. 23.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 354, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : फिर्यादी नामे- गोकुळ अंबादास बोबडे, वय 60 वर्षे, रा. जळकोटवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे जळकोटवाडी शिवारातील पत्र्याचे शेडसमोर बांधलेली एक जरसी गाय काळ्या पांढऱ्या रंगाची अंदाजे 40,000₹ किंमतीची ही दि. 17.05.2024 रोजी 18.05 ते दि. 18.05.2024 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गोकुळ बोबडे यांनी दि.23.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे- प्रदीप भास्करराव चालुक्य, वय 67 वर्षे, रा. महात्मा फुले नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांचे मुळज शिवारातील शेतातील विहीरीवर बसवलेल पाणबुडी मोटार ही दि. 21.05.2024 रोजी 19.00 वा. ते दि. 22.05.2024 रोजी 10.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रदीप चालुक्य यांनी दि.23.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-अरीफ हसन शेख, वय 28 वर्षे, रा. उमर मोहल्ला खाजानगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची हिरो कंपनीची स्पेलंडर काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 ए.वाय. 3388 ही दि. 25.03.2024 रोजी 21.15 वा. सु. म्हसोबा मंदीर जवळ गणेश नगर धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अरीफ शेख यांनी दि.23.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.