• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मराठवाड्याला पाणी देताना भेदभाव का?

-  आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सवाल

admin by admin
March 7, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…
0
SHARES
155
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  मराठवाड्याला पाणी देताना उंचीच्या अटींमध्ये भेदभाव का केला जात आहे? अशी थेट विचारणा आमदार कैलास पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. पार खोऱ्यातून गिरणा प्रकल्पासाठी 350 तालांकची अट ठेवली असताना, मराठवाड्यासाठी तीच अट 500 तालांक करण्यात आली. यामुळे गोदावरी खोऱ्यातील पाणी उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. हा भेदभाव का आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.

यावर उत्तर देताना मंत्री विखे पाटील म्हणाले, “अशा प्रकारची विसंगती जाणीवपूर्वक केली गेली असेल, तर निश्चितच कारवाई केली जाईल.” तसेच, त्यांनी उंचीची अट शिथिल करण्याचेही आश्वासन दिले.

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचा मुद्दा सभागृहात

आमदार पाटील यांनी मराठवाड्याच्या 183 दलघमी पाण्याचा मुद्दा उचलून धरला. त्यांनी सांगितले की, दुर्दैवाने आजपर्यंत मराठवाड्यातील एकाही लोकप्रतिनिधीने हा मुद्दा मांडला नव्हता. पार खोऱ्यातील नियोजित पाण्यातून मराठवाड्यासाठी 183 दलघमी पाणी उपलब्ध आहे. मात्र, गिरणा प्रकल्पाला वेगळ्या निकषावर तर मराठवाड्यासाठी वेगळ्या निकषावर पाणी दिले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

सध्या नार आणि पार खोऱ्यात 172 दलघमी पाणी शिल्लक असून, ते मराठवाड्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार का? असा आणखी एक प्रश्न आमदार पाटील यांनी विचारला. मंत्री विखे पाटील यांनी भेदभाव झाल्याचे मान्य केले आणि दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सरकारच्या धोरणांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

Previous Post

धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात गुंडगिरीचा हैदोस

Next Post

वाशीमध्ये महिलेला मारहाण, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

वाशीमध्ये महिलेला मारहाण, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीच्या घटना; दागिने, रोकड व दोन कालवडी लंपास

July 16, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर पंचायत समितीत हायव्होल्टेज ड्रामा! थेट बीडीओंच्या दालनात पेट्रोल फेकले

July 16, 2026
स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

July 16, 2026
निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

July 16, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

येडशी येथील दगडू देशमुख खून प्रकरणाचा २४ तासांत छडा!

July 15, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group