धाराशिव – जिल्ह्यातील उमरगा येथे आयोजित एका खाजगी कार्यक्रमात बोलताना आमदार बच्चू कडू यांनी भाजप आणि काँग्रेसला उघड आव्हान दिले. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या पक्षाचे 25 आमदार निवडून आले तर ते प्राध्यापक व आमदारांच्या पगारात कपात करण्याचे पहिलं काम करतील. कडू यांनी वर्तमनातल्या पगारवाढीचा उल्लेख करत म्हटले की, प्राध्यापकांना अडीच लाख रुपये आणि आमदारांना तीन लाख रुपये पगार देणे हे अन्यायकारक आहे.
कडू यांनी शरद पवार यांच्या मणिपूर संदर्भातील वक्तव्याला उत्तर देताना स्पष्ट केले की, महाराष्ट्रात मणिपूरसारखी स्थिती निर्माण होणार नाही कारण महाराष्ट्र पुरोगामी आहे.गुंडागर्दी करायला कोणाच्या बापाचं राज्य नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.
याचवेळी, लाडकी बहीण योजनेवरूनही कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली. त्यांनी म्हटले की, कष्टकऱ्यांसाठी कोणतीही ठोस योजना नाही आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये देणे याचे काहीच महत्त्व नाही. कडू यांनी सांगितले की, सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा आमदार आणि मुख्यमंत्री हवा आहे.
अखेर, कडू यांनी राज्यपालांच्या निवासस्थानावर जोरदार टीका केली, त्यांच्या 40 एकराच्या निवासस्थानी चारही बाजूंनी समुद्र असल्याचा उल्लेख करत, राज्यपालांच्या आरामशीर जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमचा महाराष्ट्राचा राज्यपाल हा 40 एकरावर राहतो. त्याचे पाय आणि हात किती लांब आहे हे पहावे लागेल. त्यांच्या घराच्या चारही बाजूने समुद्र दिसतो. आम्हाला इथे चारही बाजूने पाहील तर मौतच दिसते.