तुळजापूर येथे जागेच्या वादातून एका महिलेवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. शुक्रवार पेठेत राहणाऱ्या सुप्रिया कणकधर यांना भवानीशंकर कणकधर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने लुटल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुप्रिया यांना आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावरील 78 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने काढून घेतले. लग्नात हुंडा आणला नाही म्हणून 10 लाख रुपये आणण्याची मागणी करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही सुप्रिया यांनी केला आहे.
आरोपी नामे-भवानीशंकर नागनाथ कणकधर, शुंभागी भवानीशंकर कणकधर, श्वेतांबरी भवानीशंकर कणकधर, समर्थ भवानीशंकर कणकधर, संजना भवानीशंकर कणकधर,मामलेश्वर मार्तन्ड कणकधर सर्व रा. शुक्रवार पेठ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 12.09.2024 रोजी सांयकाळी 19.30 वा. सु. शुक्रवार पेठ तुळजापूर येथे फिर्यादी नामे- सुप्रिया लक्ष्मीनारायण कणकधर वय 34 वर्षे, रा.शुक्रवार पेठ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जागेच्या वादाचे कारणावरुनन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले.तसेच फिर्यादीच्या अंगावरील 78 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने काढून घेवून लग्नात तुला हुंडा आणला नाही म्हणून 10 लाख रुपये घेवून ये म्हणून शिवीगाळ करुन मानसिक त्रास दिला. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुप्रिया कणकधर यांनी दि.15.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 189(2), 190, 191(2), 74, 118( 1), 115(2), 352, 351(3), 119(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.