• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, August 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्हा परिषदेत प्रशासकीय भूकंप! कलाकार मानधन योजनेत गंभीर गैरव्यवहार; कनिष्ठ सहाय्यक निलंबित

admin by admin
May 27, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेत ‘राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने’च्या अर्ज छाननी प्रक्रियेत अत्यंत गंभीर अनियमितता आणि नियमबाह्य कामकाज झाल्याचे उघडकीस आले आहे. बनावट त्रुटी पूर्तता प्रस्ताव तयार करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवल्याप्रकरणी पंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक एन. बी. राऊत यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी हे निलंबनाचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवालात संबंधित कर्मचाऱ्याने कार्यालयीन शिस्त मोडून स्वतःच्या स्तरावर अर्ज स्वीकारणे, त्रुटी पूर्तता करणे आणि संपूर्ण प्रस्ताव प्रक्रियेत नियमबाह्य हस्तक्षेप केल्याचे सिद्ध झाले आहे.

असा उघड झाला गोंधळ…

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक कलाकार मानधन योजनेसाठी सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल २,४२६ अर्ज प्राप्त झाले होते. शासनाच्या नियमानुसार ऑनलाईन छाननीनंतर त्रुटी पूर्ततेची संधी देणे आवश्यक होते. मात्र, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत समोर आले.

चौकशी अहवालातील धक्कादायक बाबी:

  • एकाच हस्ताक्षरात अर्ज: अनेक लाभार्थ्यांचे अर्ज चक्क एकाच व्यक्तीच्या हस्ताक्षरात भरलेले आढळले.

  • नियमबाह्य अर्ज स्वीकृती: नियम डावलून काही अर्ज थेट कार्यालयात स्वीकारण्यात आले. वास्तव पाहता हे प्रस्ताव गट विकास अधिकाऱ्यांच्या (BDO) माध्यमातून येणे बंधनकारक होते.

  • नोंदी गायब: काही तालुक्यांतील अर्जांची कोणतीही अधिकृत नोंदच कार्यालयात उपलब्ध नव्हती. ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जांच्या संख्येत मोठी तफावत आढळून आली.

  • वरिष्ठांना वाटाण्याच्या अक्षता: उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही संपूर्ण यादी व अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करण्यात आली.

६३७ ‘पात्र’ अर्जांचा दावा बोगस?

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वी ६३७ अर्ज पात्र असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्याला कोणताही अधिकृत आधार नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रस्तावांवर ना अधिकृत निवड समितीच्या स्वाक्षऱ्या होत्या, ना कार्यालयीन पडताळणी झाली होती. त्यामुळे संपूर्ण निवड प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

ग्रामपंचायत विभागाचे इतर कारनामेही चव्हाट्यावर

या चौकशी दरम्यान केवळ कलाकार मानधनाचाच नव्हे, तर ग्रामपंचायत विभागातील इतरही अनेक प्रकरणांमधील घोळ समोर आला आहे. यामध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची वैद्यकीय बिले प्रलंबित ठेवणे, ‘सुंदर गाव’ पुरस्कार योजनेचे अहवाल रखडवणे आणि काही ग्रामपंचायतींना नियमबाह्य पद्धतीने १० टक्के निधी वर्ग केल्याचे निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे.

कळंब पंचायत समितीत मुख्यालय

गैरव्यवहाराचे स्वरूप गंभीर असल्याने संबंधित कनिष्ठ सहाय्यक एन. बी. राऊत यांना ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४’ अंतर्गत निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांची रवानगी कळंब पंचायत समिती येथे करण्यात आली असून, वरिष्ठांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

कलाकार मानधन योजनेसारख्या संवेदनशील विषयात झालेल्या या मोठ्या गैरव्यवहारामुळे जिल्हाभरातून संताप व्यक्त होत आहे. कनिष्ठ सहाय्यकाच्या निलंबनानंतर आता या प्रकरणाची पाळेमुळे कुठपर्यंत रुजली आहेत आणि यात आणखी कोणत्या बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

परंड्यात पोलिसांची मोठी कारवाई! कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या ४ गायींची सुटका; तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

बोरवंटी शिवारात कत्ती घेऊन फिरणाऱ्याला शिराढोण पोलिसांनी आवळल्या मुसक्या; घातक शस्त्र जप्त

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बोरवंटी शिवारात कत्ती घेऊन फिरणाऱ्याला शिराढोण पोलिसांनी आवळल्या मुसक्या; घातक शस्त्र जप्त

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये राजकारण तापले!  पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर ‘१ कोटीचा गद्दार’चे बॅनर्स

धाराशिवमध्ये राजकारण तापले! पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर ‘१ कोटीचा गद्दार’चे बॅनर्स

August 27, 2026
ठाकरे गटाला धक्का; धाराशिवच्या चार नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

‘ऑपरेशन लोटस’ फेल अन् ओमराजेंचे ‘ऑपरेशन टायगर’ सक्सेस! मल्हार पर्वाची हवा गुल, आता ‘आपला तो बाळ्या…’

August 27, 2026
ठाकरे गटाला धक्का; धाराशिवच्या चार नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाला धक्का; धाराशिवच्या चार नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

August 26, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : ‘मी वन विभागाचा सचिव बोलतोय, अपघात झालाय…’ भाजप तालुकाध्यक्षाला गंडा घालणाऱ्या तोतयावर तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

August 26, 2026
वर्षात फक्त ‘स्थगिती’ दिसली, ‘प्रगती’ नाही! : तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

धाराशिवमध्ये ‘घोडेबाजार’वर तानाजी जाधवरांचा घणाघात; ‘नगरसेवक पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या’

August 26, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये राजकारण तापले! पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर ‘१ कोटीचा गद्दार’चे बॅनर्स
  • ‘ऑपरेशन लोटस’ फेल अन् ओमराजेंचे ‘ऑपरेशन टायगर’ सक्सेस! मल्हार पर्वाची हवा गुल, आता ‘आपला तो बाळ्या…’
  • ठाकरे गटाला धक्का; धाराशिवच्या चार नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
  • तुळजापूर : ‘मी वन विभागाचा सचिव बोलतोय, अपघात झालाय…’ भाजप तालुकाध्यक्षाला गंडा घालणाऱ्या तोतयावर तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये ‘घोडेबाजार’वर तानाजी जाधवरांचा घणाघात; ‘नगरसेवक पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या’
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!