यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून धाराशिव जिल्ह्यात आलेला वाघ तब्बल अडीच महिने झाला तरी हाती लागत नाही! पण एवढ्या काळात वन विभागाच्या पथकांनी १५ लाखांचा ‘भोजन आणि इंधन महोत्सव’ जोरात साजरा केलाय!
🐾 वाघ कुठे? खर्च कुठे?
➡ टीमने वाघ पकडला नाही, पण सरकारच्या तिजोरीला ओरबाडलंय!
➡ १५ लाख रुपये – जेवण, गाड्यांचं इंधन आणि ‘बाहेरगावच्या पाहुणचारात’ वाया!
➡ वाघ नसेल सापडला, पण टेंडरवाल्यांचं आणि हॉटेलवाल्यांचं भाग्य मात्र खुललं!
😹 ‘बिबट्या आणि वाघ’ – कन्फ्यूजनचा कळस!
🚩 धाराशिव जिल्ह्यातील बिबट्यांची संख्या १४ वर पोहोचली!
🚩 ऊस वाढला की बिबटे वाढतात – पण काही लोकांना बिबट्याची ‘प्रोमोशन’ करून त्याला ‘वाघ’ बनवायचंय!
🚩 शेतकऱ्यांना बिबट्या दिसतो आणि अफवा पसरते – “टी-२२ वाघ आलाय!”
🦁 ‘वाघ पळाला, बिबट्या सापडला, वन विभाग गोंधळला!’
💡 पुण्याहून आलेल्या पथकाकडे ‘बिबट्या पकडण्याचा’ अनुभव आहे, वाघाचा नाही!
💡 म्हणजेच, ‘काजू बिस्कीट मागवलं आणि चहा बिनसाखरेचा मिळाला’ अशी स्थिती!
💡 आता खरं सांगू, “पथक वाघ पकडायला आलंय की बिबट्यांची हजेरी लावायला?”
🤣 पुढे काय?
✅ १४ मार्चपर्यंत वाघ सापडला नाही, तर ‘गाढव भेट’ देण्याची धमकी!
✅ बेशरम झाडाच्या खुर्चीनंतर आता ‘गाढव गिफ्ट’ ट्रेंड होतोय!
✅ वन विभागाचा खेळ ‘बिबट्या Vs वाघ’ अजून काही दिवस रंगणार!
🚨 शेतकरी म्हणतायत – “वाघ हवा नको, फक्त खर्चाचं बिल तरी दाखवा!” 🚨