येरमाळा : आरोपी नामे-1) अमोल भिमराव बनसोडे, वय 34 वर्षे, रा. भोनगिरी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.22.06.2024 रोजी 11.50 वा.सु. एनएच 52 रोडवरीलसाई हॉटेल समोरील रोडवर तेरखेडा शिवार येथुन अशोक लिलॅन्ड कंपनीचा पिकअप क्र एमएच 25 एजे 3164 मध्ये गोवंशीय जातीचे 4 जर्शी गाय 90,000₹ किंमतीचे वाहनासह असा एकुण 4, 40,000 ₹ किंमतीचे पिकअप मध्ये दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने जनावरांचे सुरक्षीततेची खबरदारी न घेता दोरीने आवळून बांधून कत्तलीसाठी घेवून जात असताना येरमाळा पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 3, 11(1)(ड)(एफ)(एच)(के),महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 5, 5(अ)(1)(2), 5(ब), महा. पोलीस अधिनियम 119, मो.वा.का 83/177 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : आरोपी नामे-1) गौस अब्बास शेख, वय 36 रा. रहिम नगर नळदुर्ग ता. तुळजापूर, 2) अरफेन मकसुद कुरेशी, 3) महमद आवेज अमीर कुरेशी, वय 18 वर्षे, दोघे रा. कुरेशी गल्ली नळदुर्ग, 4) ताहेर अली मोहमदसाब कुरेशी, वय 41 वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.06.2024 रोजी 17.30 वा.सु. उमरगा येथील बायपास रोडवरील पंजाबी हॉटेल जवळ त्रिकोळी रोड उमरगा येथुन आयशर टेम्पो क्र एमएच 25एजे 5286 या मध्ये 17 म्हशी टेम्पो मध्ये दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने जनावरांचे सुरक्षीततेची खबरदारी न घेता दोरीने आवळून बांधून कत्तलीसाठी घेवून जात असताना उमरगा पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 11(डी (ई) प्राणी परिवहन अधिनियम कलम 47, 54, 56 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मालमत्तेविरुध्द गुन्हे
तुळजापूर : फिर्यादी नामे-दगडु श्रीपती तळेकर, वय 72 वर्षे, रा.कुंभारी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 21.06.2024 रोजी 22.00 वा. सु. ते दि.22.06.2024 रोजी 02.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील अंदाजे 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम 41,000₹ असा एकुण91, 500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दगडु तळेकर यांनी दि.22.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.