येरमाळा : दिनांक 10.03.2024 रोजी 22.15 वा. सु. येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस क्षिरसागर हे स्टाप सह येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना उपळाई पाटी येथे दिनेश हॉटेल समोर एक पिकअप वाहन येरमाळा कडुन धाराशिव कडे येत असताना दिसून आले. सदरील वाहनांमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करण्यात येत असेल असा सशंय आल्यावरून पोलीसांनी सदरील वाहनाच्या चालकास गाडी थांबण्याचा इशारा केला. वाहन चालकाने गाडी रोडच्या बाजूला लावली.
सदरील वाहनाचे निरीक्षण केले असता वाहनांमध्ये अत्यंत दाटीवाटीने गोवंशीय जनावरे भरले असल्याचे निदर्शनास आले. गाडीमधीलज गोवंशी जनावरे कुठून आणलेली आहेत आणि कशासाठी आणलेली आहेत याबाबत वाहन चालकाकडे चौकशी केली असता वाहनचालकाने सामाधानकारक उत्तर दिले नाही. सदरील वाहन तात्काळ पोलीस ठाणे येरमाळा येथे घेण्याची सुचना सदरील वाहन चालकास दिली. वाहन पोलीस ठाणे येरमाळा येथे आल्यानंतर दोन पंचांच्या समक्ष सदरील वाहनाची निरीक्षण केले असता वाहनांमध्ये एकुण चार देशी जातीच्या गाई तर एक बैल सह पिकअप वाहन क्र MH 25 AJ 3146 असा एकुण 3,53,000 ₹ किंमतीच माल मिळून आला.
सदरील गाईंना वाहनांमध्ये अत्यंत दाटीवाटीने भरण्यात आले होते. या गाईंना गाडीमध्ये हालचाल करण्यासाठी पर्याप्त जागा नव्हती. अत्यंत त्रासदायक पध्दतीने त्यांची वाहतुक करण्यात येत होती. त्यावरुन आरोपी नामे- रामदास शिवाजी दराडे, वय 40 वर्षे रा. रामेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांचे विरुध्द पोलीस ठाणे येरमाळा येथे गुन्हा नोंदणी क्रमांक 60/2024 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 3,11(1) (डी),(एफ)(एच), (के), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5,5(अ)(1), (2), 5 (ब) सह मोवाका कलम 83/177, 3(1)/188 अन्वये गुन्हा नोदंवला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोहेकॉ/397 राठोड हे करीत आहेत. सदरील गुन्हृयात वापरलेले पिकअप वाहन क्र MH 25 AJ 3146 आणि गाई व बैल जप्त करण्यात आले असुन वाहन चालकास चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले आहे.