येरमाळा : येरमाळा पो.ठा.चे पथक दि. 25.02.2024 रोजी 03.00 वा.सु. येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्तीस असताना दरम्यान येडशी कडून येरमाळा हायवे एनएच 52 वर डावे बाजूस जात असताना रोडचे बाजूला येरमाळा येथे अंधाराचा दबा धरुन बसलेल्या एका इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्यांची विचारपुस केली असता त्याने आपले नाव- सुरेश महंतु पवार, वय 33 वर्षे, 2) पिंकी सुरेश पवार, वय 29 वर्षे, दोघे रा. वडगाव ज. ता. कळंब जि धाराशिव असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ते माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दोन ठिकाणी चोरी
आंबी : फिर्यादी नामे-शिवाजी मारुती काळे, वय 28 वर्षे, रा. खेडश्वरवाडी ता. परंडा जि. धाराशिव हे बार्शी येथे विवाह संमारंभासाठी गेले असता त्यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.24.02.2024 रोजी 11.45 ते 14.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 31 ग्श्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 95,000₹ असा एकुण 2,60,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शिवाजी काळे यांनी दि.25.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : फिर्यादी नामे- सरोज शिवचंद्र रेवते, वय 55 वर्षे, रा. येणेगुर ता. उमरगा जि. धाराशिव यांचे येणेगुर शिवारातील शेत गट नं 155 मधील चिंचाचे झाडे झोडपून अंदाजे 30,000₹ किंमतीचा माल आरोपी नामे- 1)माधव सायबनप्पा रेवते,2) छाया माधव रेवते दोघे रा येणेगुर, 3) मदार महेबुब मुजावर रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 23.02.2024 रोजी 07.00 ते 10.00 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सरोज रेवते यांनी दि.25.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 379, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.