येरमाळा : आरोपी नामे-जालिंदर साळुंके, वय 25 रा. इमानदार बिल्डींग वस्ती माढा जि. अकलुज यांनी दि. 19.06.2024 रोजी 02.00 ते 02.30वा. सु. राजयोग हॉटेल व बार येरमाळा येथे फिर्यादी नामे- सुनिल उर्फ राकेश श्रीधर धावारे, वय 22 वर्षे, रा. बावी ता. जि. धाराशिव ह.मु. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे झोपेत असताना नमुद आरोपीने गल्ल्यातील पैसे घेवून जाणेसाठी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. व राजयोग हॉटेलमधील गल्ल्यातील 12,000 ते 13,000 ₹ रोख रक्कम घेवून पळून गेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुनिल धावारे दि.19.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 307, 327 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भूम : आरोपी नामे-सौरभ बाराते, बालाजी बाराते, समाधान बाराते, प्रभाकर बाराते, राहुल आहेरे, खंडु बाराते सर्व रा. भुम ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 18.06.2024 रोजी 10.45 ते 12.00 वा. सु. आरसोली शिवारातील शेत गट नं 126 मध्ये फिर्यादी नामे-शुभम रविंद्र होळकर, वय 25 वर्षे, रा. जुनी भाजी मंडई संभाजी चौक भुम ता. भुम जि. धाराशिव यांना व यांचा मित्र आदित्य भोळे यांना नमुद आरोपींनी जमीनीच्या वादाच्या कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने काठी, दगड व कोयत्याने शुभम होळकर व आदित्य भोळे यांना मारहाण करुन गंभीर जखमी होवून बेशुध्द पडलेले असल्याने त्यांना घेवून जाण्यासाठी फिर्यादीचे वडील हे आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन हाताचापटाने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शुभम होळकर यांनी दि.19.06.2024 रोजी दिलेल्या वैद्यकिय जबाबावरुन भुम पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 307, 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल
येरमाळा : आरोपी नामे-1) शेख जमीर अमीन, वय 32 वर्षे, रा. अंबेजोगाई ता. अंबेजोगाई जि. बीड यांनी दि.18.06.2024 रोजी 22.30 वा.सु. स्वामी समर्थ हॉटेल जवळ तेरखेडा शिवार एनएच 52 रोडवर पिकअप क्र एमएच 13 सीयु 5509 मध्ये म्हैशीच्या 8 रेड्या वाहनासह असे एकुण 3, 75,000 ₹ किंमतीचे दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने जनावरांचे सुरक्षीततेची खबरदारी न घेता दोरीने आवळून बांधून औसा ते साळेगाव ता. केज जि बीड येथे घेवून जात असताना येरमाळा पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 11(ड) मो.वा.का 66(1)/ 192 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.