येरमाळा : फिर्यादी नामे-सुरेश उर्फ नाना वसंतराव फड, वय 37 वर्षे कन्हेरवाडी ता. परळी जि. बीड, यांचेी अंदाजे 70,000₹ किंमतीची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन ओम असलेली ही दि.24.04.2024 रोजी 11.30 वा. सु. येडेश्वरी यात्रेतील चुन्याच शेतात येरमाळा येथे अज्ञात अरोपींने गर्दीचा फायदा घेवून सुरेश फड गळ्यातील चैन चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुरेश फड यांनी दि.25.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे- अयुब मकबुल नदाफ, वय 56 वर्षे, व्यवसाय चालक बॅच नं 1335 रा. प. म. उमरगा आगार जि. धाराशिव रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 25.04.2024 रोजी बस क्र एमएच 20 बीएल 2701 व बस क्र एमएच 20 बीएल 2630 या दोन दि. 25.04.2024 रोजी 02.00 ते 06.00 वा. सु. यात्रा शेड चुन्याच्या रानात येरमाळा येथे मुक्कामासाठी थांबले असता अज्ञात व्यक्तीने बसमधील अंदाजे 36,900 ₹ किंमतीचे 410 लिटर डिझेल चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अयुब नदाफ यांनी दि.25.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे-केशरबाई माणिकराव घोलप, वय 65 वर्षे,रा. भरतपुर धनलक्ष्मी दाळ मिल बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर या दि. 24.04.2024 रोजी चुन्याचे रानात येडेश्वरी देवी पालखीचे विसावा कट्टा येथे दर्शनासाठी गेले असता केशरबाई घोलप यांचे गळ्यातील पावणे दोन तोळे सोन्याचे गंठण अंदाजे 65,000 ₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- केशरबाई घोलप यांनी दि.25.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.