• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ईट येथील यात्रेत तरुणावर जीवघेणा हल्ला; सहा जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 14, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
1.6k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी –  तालुक्यातील ईट येथील खोपेश्वर यात्रेदरम्यान ज्यूस पिण्यासाठी बसलेल्या एका तरुणावर सहा जणांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याची सोन्याची अंगठीही हिसकावून घेण्यात आली. ही घटना ९ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी वेदांत काकासाहेब घुमरे (वय २२, रा. पारगाव घुमरा, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबानुसार १३ एप्रिल २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वेदांत घुमरे हे ९ एप्रिलच्या रात्री ईट येथील खोपेश्वर यात्रेतील एका ज्यूस बारसमोर ज्यूस पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी आरोपी शंभुराजे सुबराव चव्हाण, सुभाष केशव चव्हाण, अक्षय खामकर, सचिन शिंदे (सर्व रा. ईट, ता. भुम, जि. धाराशिव), ऋषीकेश शंकर प्रभत (रा. चांदवड, ता. भुम, जि. धाराशिव) आणि इतर दोन अनोळखी इसमांनी तिथे येऊन गैरकायदेशीर जमाव जमवला.

आरोपींनी वेदांत यांना, “तू लय स्टाईल मारायला लागला आहेस, तुझा माज उतरवतो,” असे म्हणत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला चढवला. त्यांनी वेदांत यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉडने, खिळे असलेल्या लाकडी पट्टीने आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी वेदांत यांच्या मित्रांनाही आरोपींनी मारहाण करून जखमी केले.

यानंतर आरोपींनी लाईट बंद करून अंधाराचा फायदा घेतला आणि फिर्यादी वेदांत यांच्या हातातील सुमारे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर वेदांत घुमरे यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून वाशी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ३५१(२)(३), ११९(१), १८९(२), १९१(२)(३), १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण : खरं पकडलं जातंय की “खबरदार” बोलणाऱ्यांना?

Next Post

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

ताज्या बातम्या

स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

July 16, 2026
निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

July 16, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

येडशी येथील दगडू देशमुख खून प्रकरणाचा २४ तासांत छडा!

July 15, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

येडशी जंगलाजवळ तरुण शेतकऱ्याचा गळा चिरून निर्घृण खून

July 15, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली धाराशिवच्या व्यक्तीला ११.४६ लाखांचा गंडा!

July 15, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group