धाराशिव – धाराशिव शहरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी महादेव कठारे (वय ३८, रा. सारोळा) हे ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास प्रकाश किराणा दुकानासमोर उभे होते. त्यावेळी जयसुर्या कपील थोरात (रा. शाहुनगर) याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. कठारे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने थोरातने त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ब्लेडने वार करून त्यांना जखमी केले. एवढेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेप्रकरणी कठारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात थोरातविरुद्ध भा.न्या.सं.कलम 118(1), 115(1), 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.